Business Ideas Saam TV
बिझनेस

Business Ideas : नोकरीचा कंटाळा आलाय? घरबसल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हा लखपती, कसं वाचा सविस्तर

Earn Money by Social : या कामासाठी किंवा व्यवसायासाठी फक्त तुमच्याकडे युनीक माहिती असणे गरजेचं आहे. युट्यूब, फेसबूक, इंस्टाग्राम हे असे प्लॅटफॉर्म आहेत जेथे एक रुपया देखील इनवेस्ट न करता तुम्हाला लाखो रुपये कमवता येतात.

Ruchika Jadhav

Earn Money :

रोज उठून नोकरीसाठी घराबाहेर पडणे, ट्रेनचे धक्के, धावपळ आणि धकाधकीचं जीवन कुणालाही नको असतं. सध्या काम करणारे सर्वचजण या जीवनाला पूर्णत: कंटाळले आहेत. आपण स्वत:चा काहीतरी व्यवसाय करावा असा विचार अनेकजण करतात. सोप्प्या मार्गाने पैसे कमवण्याच्या ट्रिक सर्वचजण शोधत असता. त्यामुळे आज या बातमीमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून मालामाल होण्याच्या काही ट्रीक्स जाणून घेऊ.

कोरोना महामारीमुळे लोक घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी सर्वांनीच सोशल मीडियाच्या वापरावर भर दिला. आजकाल शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून तर घरातील वयोवृद्ध आजी आजोबांपर्यंत सर्वांकडे फोन आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

तुमचा कंटेन्ट चांगला असल्यास तुम्ही त्यावर व्हिडीओ बनवून तो स्वत:च्या युट्यूब चॅनलवर टाकू शकता. हाच व्हिडीओ फेसबूक आणि इंस्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर करू शकता. येथे येणाऱ्या व्हुव्ज नुसार तुमच्या चॅनलवर जाहिराती दिसतात. त्यातून तुम्हाला पैसे मिळतात.

या कामासाठी किंवा व्यवसायासाठी फक्त तुमच्याकडे युनीक माहिती असणे गरजेचं आहे. युट्यूब, फेसबूक, इंस्टाग्राम हे असे प्लॅटफॉर्म आहेत जेथे एक रुपया देखील इनवेस्ट न करता तुम्हाला लाखो रुपये कमवता येतात. आतापर्यंत अनेक युट्यूबर्सनी अशा पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करून लाखो रुपये कमवले आहेत.

एफिलिएट मार्केटिंग

घरबसल्या तुम्हाला पैसे कमवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. यातील एक म्हणजे एफिलिएट मार्केटिंग. एफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्हाला स्वत:चे काही तयार करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या फक्त सोशल मीडियावर मार्केटिंग केल्यास तुम्हाला पैसे कमवता येतात.

उदा. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, म्यंत्रा असे विविध शॉपींग अॅप आहेत. या अॅपशी संपर्क करून तुम्ही त्यांच्या प्रोडक्टची जाहिरात करू शकता. ही जाहिरात तुमच्या व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबूक अकाउंटवरून करू शकता. त्यानुसार तुमच्यामार्फत वस्तू विकत घेतली गेल्यास यात तुम्हाला ठरवून दिलेल्या टक्क्यांमध्ये कमिशन मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन

अतिवृष्टीने शेती उद्ध्वस्त, ऊसाचे पैसेही अडकले; RBI निर्बंधांमुळे बळीराजा हवालदिल | VIDEO

Dry Fruits Price : दिवाळीचा सण आणखी गोड होणार, सुकामेव्याच्या दरात २० टक्क्यांनी घट; वाचा नवे दर

Morning Flu Syndrome: सकाळी झोपेतून उठल्यानंतर शिंका आणि खोकला येतोय? कोणत्या आजारानं घेरलंय हे जाणून घ्या

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाचा झटका; परदेशात जाण्यावर बंदी, ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी दिला निर्णय

SCROLL FOR NEXT