Farming Jatropha Tree For Diesel 
बिझनेस

Jatropha Tree: शेतात लावा 'डिझेल'चं झाड; होईल बक्कळ कमाई

Farming Jatropha Tree For Diesel Business : जट्रोफा झाड आहे अर्ध-शुष्क भागात वाढत असून हे एक सदाहरित झाड आहे. या वनस्पतीच्या बियांपासून २५ ते ३० टक्के तेल काढता येते.

Bharat Jadhav

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे चालणारी वाहने चालवणं कठीण झालंय. गगनाला भिडलेल्या दरामुळे खिसा खाली होत असतो, या खर्चापासून वाचण्यासाठी जेट्रोफाचं (रतनजोत) झाड तुमची मदत करू शकतं. या जेट्रोफा झाडाला डिझेलचं झाड म्हटलं जातं. या झाडाकडे पेट्रोल-डिझेलचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. या झाडापासून बायो डिझेल तयार केलं जातं. या झाडांच्या बियांपासून शेतकरी चांगल्या प्रकरची कमाई करू शकतात.

दमदार कमाई करुन देणारा व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर तुमच्यासाठी जेट्रोफा झाडाची लागवड उपयुक्त ठरू शकते. या झाडाची लागवड करून अनेक शेतकरी श्रीमंत होत आहेत. झाडाला जट्रोफा किंवा रतनजोत म्हणतात. पण सामान्य भाषेत त्याला डिझेल प्लांटदेखील म्हणतात. वर्षाच्या कोणत्याही वेळी या झाडाची लागवड केली जाते. नापीक जमिनीतही हे झाड वाढत असते.

या झाडाच्या लागवडीमधून शेतकरी जास्त मेहनत न करता वर्षाला लाखो रुपये सहज कमवू शकतील. त्याचे बियाणेही बाजारात सहज उपलब्ध आहे. या रोपाला जास्त पाणी आणि शेताची नांगरणी करावी लागत नाही. केवळ 4 ते 6 महिन्यांसाठी काळजी घेणे आवश्यक आहे. नंतर ही वनस्पती पाच वर्षांपर्यंत बियांचं उत्पादन येऊ लागतं.

का म्हटलं जात डिझेलचं झाड

जट्रोफा झाड आहे अर्ध-शुष्क भागात वाढते. हे एक सदाहरित झाड आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात याची लागवड केली जाते. जट्रोफा वनस्पती थेट शेतात लावली जात नाहीत. आधी हे प्रथम त्याची रोपवाटिका वाढ केली जाते. मग त्याची रोपे शेतात लावली जातात. त्याच्या लागवडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते एकदा शेतात लावली की पाच वर्षांपर्यंत बियांचे पीक सहज मिळू शकते. या वनस्पतीच्या बियांपासून २५ ते ३० टक्के तेल काढता येते. या तेलाचा वापर करून कार इत्यादी डिझेल वाहने चालवता येतात. त्याच्या उरलेल्या अवशेषांपासून वीज निर्माण करता येते.

जट्रोफा वनस्पतीपासून डिझेल बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. जट्रोफा वनस्पतीच्या बिया फळांपासून वेगळे कराव्या लागतात. यानंतर बिया पूर्णपणे स्वच्छ केल्या जातात. ते नंतर मशीनमध्ये टाकले जातात. त्यातून तेल काढले जाते. ही प्रक्रिया मोहरीपासून तेल काढण्याच्या प्रक्रियेसारखीच आहे. डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे भारतासह जगभरात या जेट्रोफाची मागणी वाढलीय. भारत सरकारही या झाडाच्या लागवडीसाठी मदत करते. एक हेक्टर जमिनीवर सरासरी ८ ते १० क्विंटल बियाणे तयार होते. सरकार १२ रुपये प्रतिक्विंटल दराने बियाणे खरेदी केले जाते. बाजारात १८०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जातात. त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास पारंपरिक पिकांच्या तुलनेत बंपर उत्पन्न मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT