बजेट 2026 मध्ये नवीन प्राप्तिकर कायदा जाहीर करण्यात आलाय.
सुधारित आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ मार्चपर्यंत वाढवलीय.
परदेशी टूर पॅकेजेसवरील टीसीएस २% पर्यंत कमी.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात प्राप्तिकराशी संबंधित अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामुळे सामान्य लोकांना आणि करदात्यांना दिलासा मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात नवीन प्राप्तिकर कायदा जाहीर केला. हा कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे.
दुसरकडे आयटीआर सुधारण्याची अंतिम तारीख ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर परदेशी टूर पॅकेजेसवरील टीसीएस २% पर्यंत कमी करण्यात आलाय. चुकीच्या पद्धतीने उत्पन्न नोंदवल्यास आता १००% दंड आकारला जाईल. कर प्रणाली सोपी आणि अधिक पारदर्शक बनवण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत.
आयटीआर सुधारण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे, परंतु त्यासाठी एक लहान दंड शुल्क लागू असणार आहे. आयटीआर-१ आणि आयटीआर-२ दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै राहील, त्यात कोणताही बदल करण्यात आला नाहीये.
परदेशी टूर पॅकेजेसवरील टीडीएस दर २ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. आधी ५टक्के ते २० टक्के होता.
लहान करदात्यांसाठी ६ महिन्यांची परदेशी मालमत्ता उघड करण्याची योजना (फॉरेन एसेट डिस्क्लोजर स्कीम) सुरू केली जाईल. परदेशी मालमत्ता उघड करण्याची संधी प्रदान करेल.
अनिवासी लोकांकडून मालमत्तेच्या विक्रीवर टीडीएस आकारला जाणार.
उत्पन्नाची चुकीची नोंद केल्याबद्दल आता दंड कराच्या रकमेच्या १००% असेल, म्हणजेच कठोर अंमलबजावणी.
आयकर नियमांचे सरलीकरण लवकरच केले जाणार.
दरम्यान आर्थिक वर्ष २७ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ४.३% राहण्याचा अंदाज आहे, जो पूर्वीपेक्षा चांगला आहे. आर्थिक वर्ष २७ मध्ये कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर ५५.६% पर्यंत सुधारेल. आर्थिक वर्ष २६ साठी राजकोषीय तूट ४.४% असेल, एकूण बाजार कर्ज १७.२ लाख कोटी आणि निव्वळ ₹११.७ लाख कोटी असा अंदाज आहे. आर्थिक वर्ष २७ मध्ये निव्वळ कर प्राप्ती २८.७५ लाख कोटी होण्याची अपेक्षा आहे. कर प्रणाली सोपी, पारदर्शक आणि अनुपालन-अनुकूल बनवण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आलेत.
आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या.
तुमचा युझर आयडी (पॅन), पासवर्ड आणि कॅप्चा वापरून लॉगिन करा.
ई-फाइल सेक्शन: 'e-File' मेनू वर जा > 'Income Tax Return' पर्याय निवडा. 'File Income Tax Return' वर क्लिक करा.
असेसमेंट वर्ष आणि प्रकार : संबंधित असेसमेंट वर्ष (AY) निवडा, फाइलिंग टाइपमध्ये म्हणजेच प्रकारात Original ऐवजी 'Revised Return' (धारा 139(5) च्या अंतर्गत) पर्याय निवडा.
जुनी माहिती: मूळ परताव्याच्या पावती क्रमांक (Acknowledgement Number) आणि मूळ दाखल फाइलिंगची तारीख टाका.
सुधारणा करा: आता फॉर्ममध्ये योग्य माहिती भरा (जसे की योग्य उत्पन्न, चुका किंवा अतिरिक्त वजावटी).
व्हेरिफिकेशन: फॉर्म भरल्यानंतर, आधार ओटीपी, नेट बँकिंग किंवा इतर पद्धती वापरून तुमचा सुधारित आयटीआर ई-व्हेरिफाय करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.