No Tax On Two Houses  Saam Tv
बिझनेस

Budget 2025: २ घरांचे मालक आहात, टॅक्सचं टेन्शन घेऊ नका!; बजेटमध्ये तुमच्या फायद्याची घोषणा

No Tax On Two Houses : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गीयांना दिलासा दिलाय. त्यांनी मध्यमवर्गीयांना अनेक प्रकारेच्या करात सवलत दिली आहे.

Bharat Jadhav

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा दिलाय. ज्या लोकांची दोन घरे आहेत, त्यांना मोठा दिलासा या अर्थसंकल्पातून देण्यात आलाय. अर्थमंत्र्यांनी दुसऱ्या घराच्या बाबतीत करदात्यांना मोठा दिलासा दिलाय. यापूर्वी केवळ एकाच घरावर कर सवलत मिळत होती. दुसऱ्या घरावर बाजारमूल्यानुसार कर आकारणी करण्यात येत होती.

मात्र आता त्यातून सवलत देण्यात आलीय, करदात्यांना आयकर विवरणपत्र भरताना घराच्या मालमत्तेवर कर मोजावा लागणार नाहीये. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गीयांना दिलासा दिलाय. मध्यमवर्गीयांमध्ये दोन घरे असणारे अनेक लोक आहेत. त्यांच्यासाठी सरकारने मोठी घोषणा केलीय. आता दोन घरांचे मूल्य कराच्या दृष्टिकोनातून शून्य मानलं जाणार आहे.

यामुळे ज्या लोकांकडे दोन घरे आहेत, त्यांना यापुढे त्यांच्या दुसऱ्या घरावरील कराची चिंता करण्याची गरज नाहीये. घराच्या मालमत्तेवरील कर नियमांमध्ये बदल झाल्यामुळे दोन घरे असलेल्या करदात्यांना आयकर विवरणपत्र भरताना घराच्या मालमत्तेवर कर मोजावा लागणार नाहीये. यामुळे ते दोन घरांचे मुल्य क्लेम शुन्य करू शकतील. जर कोणत्या करदात्याकडे तीन घरे आहेत त्यांना फक्त तिसऱ्या घराच्या मुल्यावर कर मोजावा लागेल.

नवीन नियम १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार

अर्थमंत्र्यांनी १ फेब्रुवारी रोजी केलेली ही घोषणा १ एप्रिल २०२५ पासून लागू होईल. याचाच अर्थ जर कोणता व्यक्ती आपल्या घरात राहतो किंवा त्या घराचा उपयोग करत नाही, त्यामुळे मालमत्तेचे वार्षिक मूल्य शून्य मानले जाईल. जर समजा एक व्यक्ती आहे ज्याची दोन घरे आहेत. जरी तो एक घर त्याच्या निवासासाठी वापरत असेल आणि दुसरे घर रिकामे असेल, तरीही तो दोन्ही घरे स्वतःची म्हणून दावा करू शकतो.

अशा प्रकारे त्याला दुसऱ्या घरावर कोणताही कर भरावा लागणार नाही. जर एखाद्या व्यक्तीकडे तीन घरे असतील तर तो स्वत:च्या वापरासाठी कोणत्याही दोन घरांचा विचार करू शकतो. यामुळे त्या व्यक्तीला तिसऱ्या घराच्या वार्षिक भाड्याच्या मूल्यावरच कर मोजावा लागेल. घराच्या मालमत्तेबाबतच्या नियमातील या बदलामुळे मोठ्या प्रमाणात करदात्यांना दिलासा मिळणार आहे. त्यांच्यावरील कर अनुपालनाचा बोजा कमी होईल, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT