Budget 2025 Saam Tv
बिझनेस

Budget 2025: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट! पीएम किसान योजनेचा निधी १०,००० होण्याची शक्यता

PM Kisan Sanman Nidhi Yojana: केंद्र सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊ शकते. पीएम किसान योजनेचा निधी वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddhi Hande

अर्थमंत्री निर्मला सितारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना अनेक अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पात सरकार अनेक निर्णय घेऊ शकते. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. यामध्ये पीएम किसान योजनेचा निधी वाढवला जाऊ शकतो. (Budget 2025)

पीएम किसान सन्मान निधी योजनेत सध्या ६००० रुपये दिले जातात. तर आता या योजनेत १०,००० रुपये दिले जाऊ शकतात. या योजनेत पैसे वाढवले जाऊ शकतात. याबाबत अर्थसंकल्पात घोषणा केली जाऊ शकते.

मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प असणार आहे. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात मोठं गिफ्ट मिळणार आहे. या योजनेतील निधी १०,००० रुपये होऊ शकतो. (PM Kisan Sanman Nidhi)

पीएम किसान योजनेत ६००० रुपये दिले जातात. या योजनेत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. प्रत्येक हप्त्यात २००० रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेत १८ हप्ते दिले जातात. पुढच्या महिन्यात या योजनेचा १९ वा हप्ता दिला जाऊ शकतो.

शेतकरी आणि तज्ञांच्या म्हणण्यांनुसार, महागाईमुळे शेतीतील खर्च वाढत आहे. यामुळे ६००० रुपये पुरेसे नाहीत. त्यामुळेच हे पैसे वाढवून देण्याचा सरकार विचार करत आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पीएम किसान योजनेत निधी वाढवला तर लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचा निधी वाढवण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat Loss Drink: पोटाची वाढलेली चरबी कमी करायची आहे? मग रोज सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक

Post Office RD: दररोज ३०० वाचवा अन् पोस्टात गुंतवा, फक्त व्याजातून मिळतील साडेचार लाख, वाचा सविस्तर

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

SCROLL FOR NEXT