BSNL Google
बिझनेस

BSNL चा धमाका! 200GB पेक्षा जास्त हाय-स्पीड डेटा आणि फ्री OTT सब्सक्रिप्शन

BSNL दररोज २०० जीबी पेक्षा जास्त डेटा देणारा ब्रॉडबँड प्लान ऑफर करत आहे. 300 Mbps पेक्षाजास्त स्पीडसह अनलिमिटेड फ्री वॉईस कॉलिंग आणि डिज्नी प्लस + , सोनीलिव्ह, इतर फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळतं.

Bharat Jadhav

जर कोणतीही कंपनी तुम्हाला कोणत्याही प्लानमध्ये दररोज 200GB पेक्षा जास्त डेटा देत असेल, तर तुम्ही नक्कीच नकार देऊ शकणार नाहीत. इतका मोठा डेटा मिळत असेल तर तु्म्ही तुमच्या ऑफिसची कामे देखील सहजपूर्ण करू शकतात. जरी तुम्ही दररोज तासन्तास OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि टीव्ही शो पाहत असाल तरी हा डेटा संपणार नाही. सरकारी कंपनी BSNL आपल्या एका प्लानमध्ये इतका डेटा देत आहे. याशिवाय इतरही अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.

जरी तुम्ही दररोज तासन् तास OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि टीव्ही शो पाहत असाल तर बीसएनएलचा हा डेटा प्लान तुमच्यासाठी सुपर ठरेल. सरकारी कंपनी BSNL आपल्या एका प्लानमध्ये इतका मोठा डेटा देत आहे. बीएसएनएलच्या या ब्रॉडबँड प्लानमध्ये कंपनी दरमहा 6500 जीबी डेटा देत आहे. म्हणजेच दररोज 200GB पेक्षा जास्त डेटा. हा डेटा ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला 300 Mbps चा स्पीड मिळेल.

याचा अर्थ तुम्हाला डेटा बॅलन्स आणि स्पीड या दोन्हीबाबत काळजी करण्याची गरज नाहीये. तुम्ही कितीही डेटा वापरला तरी तुमची इंटरनेट सर्व्हिस बंद होणार नाहीये. तुम्ही 40 Mbps च्या वेगाने अमर्यादित इंटरनेट वापरण्यास सक्षम असाल. याशिवाय अनलिमिटेड फ्री व्हॉईस कॉलिंगचाही फायदा आहे.

OTT ॲप्सचं मोफत सब्सक्रिप्शन

या प्लानमध्ये फक्त इंटरनेट डेटा आणि कॉलिंग उपलब्ध नसणार आहे. यासोबतच सरकारी दूरसंचार कंपनी अनेक OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शनही देत ​​आहे. या प्लानमध्ये डिज्नी प्लस, हॉटस्टार, हंगामा, लायन्स गेट, शेमारूमी शेमारू, सोनीलिव्ह, Zee5 प्रीमियम आणि YuppTV चे सब्सक्रिप्शन फ्री मिळत आहे. या ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला 4,799 शुल्क द्यावे लागेल.

स्वस्त प्लान पाहिला का?

जर तुम्हाला या कंपनीचा जणून स्वस्त प्लान घ्यायचा असेल तर बीएसएनलचा Fiber Entry Broadband Plan चा चांगला पर्याय आहे. यात 20Mbpsच्या स्पीडसह प्रत्येक महिन्याला 1000GB डेटा मिळतो. यात तुम्हाला अनलिमिटेड डेटा डाऊनलोड आणि फ्री वॉइस कॉलिंगची सुविधाही मिळते. या प्लानसाठी तुम्हाला दर महिन्याला 329 रुपये शुल्क भरावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT