बिझनेस

BSNL Offers: बीएसएनएल यूजर्ससाठी मोठा अपडेट! आता नेटवर्क कनेक्शनशिवायही कॉल करण्याची सुविधा, वाचा सविस्तर

BSNL Network Free Calls: सरकारी कंपनी BSNL ने यूजर्ससाठी मोठा अपडेट दिला आहे. आता ग्राहक मोबाईल नेटवर्क नसतानाही व्हॉइस कॉल करता येणार आहेत, ज्यामुळे संपर्क कायम ठेवणे सोपे होईल.

Dhanshri Shintre

  • बीएसएनएलने आपल्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत VoWiFi सेवा सुरू केली आहे.

  • ग्राहक आता वाय-फाय वापरून मोबाईल नेटवर्कशिवाय कॉल करू शकतील.

  • ही सेवा सध्या दक्षिण आणि पश्चिम भारतात उपलब्ध असून लवकरच देशभर कार्यान्वित होईल.

  • या उपक्रमामुळे बीएसएनएल आता जिओ, एअरटेल आणि व्हीआय सारख्या कंपन्यांशी थेट स्पर्धेत उतरले आहे

सरकारी मालकीची कंपनी (बीएसएनएल) आपल्या यूजर्ससाठी एक मोठी भेट घेऊन आली आहे. कंपनीने आता व्हॉइस ओव्हर वाय-फाय (VoWiFi) सेवा सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसतानाही कॉल करण्याची सुविधा मिळणार आहे. या नव्या सेवेच्या मदतीने यूजर्स मोबाईल नेटवर्कऐवजी वाय-फाय कनेक्शनद्वारे कॉल करू शकतील. जिओ, एअरटेल आणि वीसारख्या खाजगी कंपन्या आधीच ही सेवा देत असल्याने या सेवेच्या लाँचमुळे बीएसएनएल आता त्या कंपन्यांच्या बरोबरीने आले आहे.

बीएसएनएलने नुकत्याच आपल्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त या सेवेची घोषणा केली आहे. ज्याला कंपनीच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ही सेवा २ ऑक्टोबर रोजी दूरसंचार विभागाचे सचिव नीरज मित्तल यांच्या हस्ते सॉफ्ट-लाँच करण्यात आली. सध्या ती दक्षिण आणि पश्चिम वर्तुळात सुरू आहे, परंतु संस्थेचा उद्देश ती लवकरच देशभर उपलब्ध करण्याचा आहे. याचबरोबर कंपनीने मुंबईत ४जी आणि eSIM सेवा देखील सुरू केल्या आहेत, ज्यांचा प्रारंभ काही काळापूर्वी तामिळनाडूमध्ये झाला होता.

बीएसएनएलने अलीकडेच देशभरात १ लाखांहून अधिक मोबाइल टॉवर्स बसवले असून, ४जी सेवांचा विस्तार केला आहे. कंपनी पुढील काळात सुमारे ९७,५०० नवीन टॉवर्स बसवण्याची योजना आखत आहे. या उपक्रमांमुळे कंपनी आपल्या नेटवर्कचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकत आहे.

VoWiFi सेवेचा सर्वात मोठा फायदा कमकुवत मोबाइल नेटवर्क असलेल्या भागांतील यूजर्सना होईल. अशा ठिकाणी यूजर्स त्यांच्या घरातील वाय-फाय किंवा ब्रॉडबँड कनेक्शन वापरून सहज कॉल करू शकतील. कॉलची गुणवत्ता अधिक स्पष्ट राहील. त्यामुळे बोलताना अडथळे येणार नाहीत. तथापि, या सेवेचा वापर करण्यासाठी फोनमध्ये VoWiFi सपोर्ट असणे आवश्यक आहे. सध्याच्या बहुतांश नवीन अँड्रॉइड फोन आणि आयफोन मॉडेल्समध्ये हा पर्याय उपलब्ध आहे आणि तो सेटिंग्जमधून सक्रिय करता येतो.

बीएसएनएलने स्पष्ट केले आहे की ही सेवा ग्राहकांसाठी पूर्णपणे मोफत असेल. कॉलिंगसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटरवर अकांऊटवरुन जाहीर केले की VoWiFi सेवा ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अधिक चांगली कनेक्टिव्हिटी आणि अखंड कॉलिंग अनुभव देईल.

बीएसएनएलने कोणती नवी सेवा सुरू केली आहे?

बीएसएनएलने व्हॉइस ओव्हर वाय-फाय (VoWiFi) सेवा सुरू केली आहे, ज्याद्वारे वापरकर्ते वाय-फाय कनेक्शनद्वारे कॉल करू शकतात.

ही सेवा देशभरात कधी उपलब्ध होणार आहे?

सध्या ही सेवा दक्षिण आणि पश्चिम वर्तुळात सुरू झाली आहे आणि लवकरच संपूर्ण देशात उपलब्ध होईल.

 ग्राहकांना या सेवेचे शुल्क द्यावे लागेल का?

नाही, ही सेवा पूर्णपणे मोफत असेल आणि कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत महापौर कुणाचा? मनसे की ठाकरे? बड्या खासदाराने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : गौतमी पाटीलला क्लिनचीट, अपघातावेळी वाहनात नव्हती

Crime: शौचासाठी घराबाहेर पडली, परत आलीच नाही; बलात्कार करून चिमुकलीची हत्या, शेजारच्या घरातच...

मोठी बातमी! नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; कोणती जागा कुणासाठी? VIDEO

DA Hike: खुशखबर! आठव्या वेतन आयोगाआधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ; या महिन्यापासून येणार

SCROLL FOR NEXT