बिझनेस

Budget Friendly Plan: सणासुदीचा भन्नाट प्लॅन, फक्त १ रुपयात मिळवा दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग

BSNL Diwali Offer: ई-कॉमर्ससोबतच टेलिकॉम कंपन्याही सणासुदीच्या ऑफर्स देत आहेत. बीएसएनएलने खास सणासुदीची ऑफर लाँच केली. ज्यामुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

Dhanshri Shintre

दिवाळी बोनान्झा २०२५ ऑफर

बीएसएनएलने दिवाळी बोनान्झा २०२५ ऑफर सुरू केली आहे. या खास दिवाळी ऑफरमुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे लक्ष वेधले गेले असून, लाखो मोबाईल यूजर्सना कमी किमतीत फायदे मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

१ रुपयात ४जी सेवा उपलब्ध

बीएसएनएलने दिवाळी बोनान्झा २०२५ ऑफरअंतर्गत ग्राहकांना फक्त १ रुपयात ४जी सेवा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय, कंपनी लाखो वापरकर्त्यांसाठी १ महिन्याची वैधता असलेली योजना देखील देणार आहे.

यूजर्सना विशेष फायदे

बीएसएनएल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. अलीकडे कंपनीने 4G सेवा सुरू केली असून, आता दिवाळी बोनान्झा ऑफर लाँच करून यूजर्सना विशेष फायदे देण्याचा निर्णय घेतला आहे.

मर्यादित काळासाठी उपलब्ध

बीएसएनएलच्या माहितीनुसार, दिवाळी बोनान्झा २०२५ ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे आणि फक्त १५ नोव्हेंबरपर्यंतच ग्राहकांना लाभ मिळेल. हा प्लॅन कमी किमतीत अनेक फायदे देतो.

१ रुपयात सिम घेऊन फायदे

बीएसएनएलने दिवाळी ऑफर अंतर्गत नवीन ग्राहकांसाठी फक्त १ रुपयात ४जी सिम उपलब्ध करून दिला आहे. फक्त १ रुपयात सिम घेऊन तुम्ही ३० दिवसांसाठी सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंगचा आनंद घेऊ शकता, ज्यामुळे महागाईच्या काळात मोठा फायदा मिळतो.

एक महिन्याची वैधता

बीएसएनएलच्या दिवाळी ऑफरमध्ये १ रुपयांच्या ४जी सिमसह ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेट डेटा देखील मिळेल. या सिमद्वारे दररोज २ जीबी डेटा वापरता येईल. म्हणजे एकूण ३० दिवसांत तुम्हाला फक्त १ रुपयात ६० जीबी पर्यंत हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ मिळेल.

कोणसाठी ऑफर उपलब्ध?

बीएसएनएलच्या १ रुपयांच्या ४जी सिमची वैधता फक्त ३० दिवसांची आहे. सिम घेण्यासाठी संपूर्ण KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही ऑफर फक्त नवीन ग्राहकांसाठी आहे. आधीच सिम असलेल्या ग्राहकांसाठी लागू नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT