FD Break Rules meta ai
बिझनेस

FD Break Rules: FD तोडण्याचा विचार करताय? आधी जाणून घ्या बँक किती पेनल्टी कापते आणि नुकसान कसे टाळाल

FD Withdrawal : मॅच्युरिटीआधी FD तोडल्यास व्याजदर कमी होऊन पेनल्टी लागू शकते. FD मोडण्याआधी बँकेचे नियम, सुधारित व्याजदर आणि FD वर लोन घेण्याचा पर्याय तपासणं महत्त्वाचं आहे.

Sakshi Sunil Jadhav

तुम्हीही भविष्यात मोठी गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारा लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. मात्र अचानक आर्थिक अडचण निर्माण झाल्यास अनेकजण मॅच्युरिटीआधीच FD मोडण्याचा निर्णय घेतात. पण प्री-मॅच्युअर FD विथड्रॉल केल्याने अपेक्षित परतावा कमी होऊ शकतो आणि बँकेकडून पेनल्टीही आकारली जाऊ शकते.

मॅच्युरिटीआधी FD तोडल्यावर काय होईल?

FD ठरलेल्या कालावधीआधी बंद केल्यावर बँक सुरुवातीला ठरलेला व्याजदर देईलच असं नाही. FD ज्या कालावधीपर्यंत बँकेत ठेवली होती, त्या कालावधीसाठी लागू असलेल्या व्याजदरानुसार व्याजाची पुनर्गणना केली जाऊ शकते.

उदाहरणार्थ, तुम्ही ३ वर्षांसाठी ७ टक्के व्याजदराने FD केली आणि एका वर्षानंतर पैसे काढले तर ३ वर्षांचा ७ टक्के दर मिळण्याची शक्यता नसते. त्याऐवजी एका वर्षाच्या FD साठी लागू असलेल्या दरानुसार व्याज मिळू शकतं.

पेनल्टीमुळे दुहेरी नुकसान

व्याजदर कमी होण्याबरोबरच काही बँका प्री-मॅच्युअर विथड्रॉलवर पेनल्टी आकारतात. साधारणपणे सुधारित व्याजदरावर ०.५ ते १ टक्क्यांपर्यंत दंड लागू होऊ शकतो. मात्र प्रत्येक बँक आणि FD प्रकाराचे नियम वेगळे असतात. त्यामुळे FD तोडण्याआधी संबंधित बँकेच्या नियमांची तपासणी करणं महत्त्वाचं आहे.

पूर्ण FD तोडण्याऐवजी हा पर्याय तपासा

जर आपल्याला FDची संपूर्ण रक्कम आवश्यक नसेल, तर FD मोडण्याऐवजी FDवर लोन किंवा ओव्हरड्राफ्ट घेण्याचा पर्याय पाहता येतो. काही बँका FDच्या रकमेच्या सुमारे ९० टक्क्यांपर्यंत कर्ज किंवा ओव्हड्राफ्ट सुविधा देतात. त्यामुळे FD सुरू राहून त्यावर व्याज मिळत राहू शकतं.

FD तोडण्याआधी ३ गोष्टी तपासा

लागू होणारा सुधारित व्याजदर किती?

प्री-मॅच्युअर विथड्रॉल पेनल्टी किती?

FDवर लोन किंवा ओव्हरड्राफ्ट घेणं जास्त फायदेशीर ठरेल का?

थोडक्यात, आपत्कालीन गरजेसाठी FD मोडण्याआधी सर्व पर्यायांची तुलना करा.FD सोबत काही रक्कम बचत खात्यात किंवा सहज उपलब्ध गुंतवणुकीत ठेवणं भविष्यात उपयोगी ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आताची सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी संधी; भाजपच्या 'या' सर्वात ताकदवर समितीत होणार एन्ट्री?

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

SCROLL FOR NEXT