LPG Gas Cylinder saam tv
बिझनेस

LPG Cylinder Price: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, १८३ रुपयांनी स्वस्त झाला गॅस सिलिंडर

LPG Gas Cylinder Price Drop: व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात झाली आहे. हा गॅस सिलिंडर १८३ रुपयांनी स्वस्त झाला. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला

Priya More
  • एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात

  • १ जुलैपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १८३ रुपयांनी स्वस्त झाला

  • १९ किलो सिलिंडरची किंमत ३,११३.५० वरून २,९३० रुपये झाली

  • घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही

LPG Cylinder Rate: जुलै महिन्याची सुरूवात झाली असून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. सरकारने १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात १८३.५० रुपयांची कपात केली. आता १९ किलोच्या गॅस सिलिंडरचे दर ३,११३.५० रुपयांवरून आता २,९३० रुपये झाला आहे.

१४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यावर्षी पहिल्यांदाच व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. सिलिंडरचे दर कमी झाल्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला. मध्य-पूर्वेतील तणावामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली होती. आता १ जुलै २०२६ रोजी दिल्ली आणि इतर शहरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली. २०२६ मध्ये पहिल्यांदाच तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत कमी केली आहे.

जानेवारी २०२६ मध्ये दिल्लीत या सिलिंडरचा दर १६९१.५० रुपये होता जो जूनमध्ये जवळपास दुप्पट झाला. मार्च २०२६ मध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ झाली. १ मार्च रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडर २८ रुपयांनी महाग झाला होता आणि ७ मार्च रोजी तो ११४.५० रुपयांनी महाग झाला होता. मे महिन्यात या सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ झाली आणि दिल्लीतील किंमत थेट ३०७१.५० रुपयांवर पोहोचली. १ जून रोजी तो ४२ रुपयांनी महाग झाला.

तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करून दिलासा दिला असला तरी देखील घरगुती गॅस सिलेंडरच्या (१४ किलो एलपीजी सिलेंडर) दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ९४२ रुपये, तर कोलकातामध्ये ९६८ रुपये आहे. मुंबईत १४ किलोचा सिलिंडर ९४१.५० रुपयांना, तर चेन्नईमध्ये ९५७.५० रुपयांना मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या सोनम मस्करचा लक्षवेध, १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT