LPG Connection Rules meta ai
बिझनेस

LPG Connection : गॅस कनेक्शनबाबत मोठा बदल! आधार व्हेरिफिकेशन नाही केलं तर LPG लाभार्थी कमी होणार?

LPG Connection Rules : LPG ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नवीन LPG कनेक्शनवर मर्यादा, आधार व्हेरिफिकेशन आणि e-KYC मुळे ग्राहकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

देशभरात मोठ्या प्रमाणावर घरगुती LPG गॅसचा वापर केला जातो. मात्र, सध्या LPG कनेक्शनच्या संख्येत घट होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामागे फक्त नवीन गॅस कनेक्शनवर लावण्यात आलेली मर्यादा नाही, तर जुनं कनेक्शन, आधार व्हेरिफिकेशन आणि e-KYC यांसारख्या प्रक्रियांचाही परिणाम होत आहे.

एलपीजी ग्राहकांना गेल्या काही काळापासून आधार व्हेरिफिकेशन आणि e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. यामागचा मुख्य उद्देश सबसिडीचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, एका व्यक्तीच्या नावावर असलेली अनेक कनेक्शन शोधणे, जुने रेकॉर्ड अपडेट करणे आणि बनावट कनेक्शन्स हटवणे हा आहे.

नवीन कनेक्शन का मिळत नाही?

मिडल ईस्टमधल्या तणावामुळे LPG तसेच पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. पुरवठा व्यवस्थेवरचा दबाव वाढल्यानंतर तेल कंपन्यांकडून काही वेळ नवीन घरगुती LPG कनेक्शनवर मर्यादा आणण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे नवीन कनेक्शन विकत घेणाऱ्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

तसेच, तेल कंपन्यांकडून जुन्या LPG कनेक्शन्सचीही तपासणी सुरू आहे. कोणते कनेक्शन वापरात आहे, कोणते बंद आहे, एकाच कुटुंबाच्या नावावर अनेक कनेक्शन्स आहेत का किंवा घरात PNG कनेक्शन उपलब्ध आहे का, याची पडताळणी केली जात आहे.

उज्ज्वला लाभार्थ्यांची संख्या घटली

तसेच या तपासणीचा परिणाम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येवरही झाल्याची माहिती आहे. आधी १०.६३ कोटी असलेली लाभार्थ्यांची संख्या आता १०.५७ कोटींवर आली आहे. म्हणजेच सुमारे ६ लाख लाभार्थी कमी झाले आहेत.

३० सप्टेंबरपर्यंत e-KYC?

LPG कनेक्शनची e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर असल्याचे सांगितलं जात आहे. e-KYC न केल्यास १ ऑक्टोबरपासून LPG सब्सिडीचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. तसेच सिलेंडर बुकिंग प्रक्रियेतही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे LPG ग्राहकांनी आपल्या कनेक्शनची e-KYC आणि आधार व्हेरिफिकेशनची स्थिती तपासणे महत्त्वाचे ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Benefits After Lunch And Dinner: जेवणानंतर चालणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: कोरेगावला दुष्काळी यादीतून वगळल्याने शेतकरी आक्रमक

ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा! महिलांकडून शिंदे गटाच्या युवासेनेच्या नेत्याला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Rajma vs Chole Rice : राजमा-भात की छोले-भात? जास्त प्रोटीन कुठून मिळतं, आजपासून डाएटमध्ये करा समावेश

Akshaye Khanna: अक्षय खन्नाने मुंबईच्या पॉश भागात घेतला आलिशान फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT