

पितृपक्षाची सुरुवात होत असतानाच सोनं-चांदीच्या दराने गुंतवणूकदार आणि ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोनं आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. महत्त्वाचं म्हणजे, शनिवारी झालेल्या घसरणीनंतर सोमवारी बाजार उघडताच मौल्यवान धातूंच्या किमती पुन्हा खाली आल्या. त्यामुळे सध्या सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी बाजारातल्या हालचाली महत्त्वाच्या ठरत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत होती. जुलै आणि ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरात जवळपास ११ टक्क्यांची वाढ झाली होती. मात्र सप्टेंबरमध्ये या तेजीला ब्रेक लागल्याचं चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव २.५८ टक्क्यांनी म्हणजेच १११ डॉलरने घसरून ४,२०९ डॉलरपर्यंत खाली आला.
या घसरणीमागे अमेरिकन बाँड यील्डमधील वाढ, फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाबद्दस अपेक्षा आणि मजबूत होत असलेला डॉलर ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. डॉलर मजबूत झाल्यास इतर चलनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सोने तुलनेने महाग होते. परिणामी सोन्याच्या मागणीवर दबाव येऊ शकतो.
जळगावच्या बाजारात शनिवारी ७२१ रुपयांची घसरण झाल्यानंतर २४ कॅरेट सोन्याचा दर ३ टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५६,०४५ रुपये होता. सोमवारी सकाळी आणखी २,७८१ रुपयांची घट झाली आणि दर १,५३,२६४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलेला आहे.
चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. शनिवारी २,०६० रुपयांनी दर कमी झाल्यानंतर चांदीचा भाव जीएसटीसह प्रति किलो २,३९,९९० रुपये होता. सोमवारी त्यात आणखी ७,२१० रुपयांची घट झाली आणि दर २,३२,७८० रुपये प्रति किलो झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.