Big GST Reforms 12% and 28% Slabs saam tv
बिझनेस

GST Tax Reforms: मोठी बातमी! १२, २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द, जीएसटी प्रणालीतील बदलाच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल

Big GST Reforms 12% and 28% Slabs : सरकारने १२% आणि २८% कर स्लॅब रद्द करून जीएसटी सुधारणांना मान्यता दिली आहे. आता फक्त ५% आणि १८% जीएसटी राहील, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल आणि करप्रणाली सोपी होईल.

Bharat Jadhav

  • केंद्र सरकारकडून जीएसटीमध्ये मोठा बदल जाहीर.

  • १२% आणि २८% स्लॅब रद्द करून फक्त ५% आणि १८% स्लॅब ठेवले.

  • GoM च्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

  • नागरिकांना करसवलतीचा दिलासा आणि प्रणाली सुलभ होणार.

महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. सरकार जीएसटीमधील स्लॅबमध्ये कपात करून आता फक्त ५ आणि १८ टक्के स्लॅब राहणार आहे. हो, जीएसटीमध्ये असलेले १२ आणि २८ टक्क्यांचा स्लॅब पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे. आज झालेल्या GoM च्या म्हणजेच ग्रॅुप ऑफ मिनिस्टर्सच्या बैठकीत केंद्र सरकारचा स्लॅब कमी करण्याचा प्रस्ताव स्विकारण्यात आलाय.

आता जीएसटीमधील ५,१२, १८, २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात येणार आहे. या स्लॅबमध्ये येणाऱ्या वस्तू आता ५ आणि १८ स्लॅबमध्ये येणार आहे. या निर्णयामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. तर १२ टक्क्यांमध्ये येणाऱ्या बऱ्याचशा वस्तू आता ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये येणार आहे. तर २८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये येणाऱ्या ९० टक्के वस्तू सेवा १८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये येणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासोबत झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले, “आम्ही १२% आणि २८% च्या जीएसटी स्लॅब रद्द करण्याच्या भारत सरकारच्या दोन्ही प्रस्तावांना पाठिंबा दिलाय. बैठकीत सर्वांनी केंद्राच्या प्रस्तावाबाबत आपले मत आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच काही राज्यांच्या प्रतिक्रियांचाही त्यात समावेश करण्यात आलाय. केंद्र सरकारचा प्रस्ताव जीएसटी कौन्सिलकडे पाठवण्यात आलाय. आता कौन्सिल पुढील निर्णय घेईल. २ स्लॅब रद्द करण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकारने चर्चा केली होती त्याला पाठिंबा देण्यात आलाय.

काय होणार स्वस्त

१२ टक्के स्लॅबमधून ५ टक्के स्लॅबमध्ये येणाऱ्या वस्तू

१२% कर स्लॅब रद्द करून तो ५% पर्यंत कमी केल्यास यावरील कर सुमारे ७% ने कमी होईल. यामुळे या गोष्टी स्वस्त होतील-

कपडे आणि रेडीमेड गारमेंट्स तसेच १००० रुपयांवरील कपडे सुद्धा स्वस्त होऊ शकतात.

बुट-चप्पल

प्रिटिंग आणि स्टेशनरी वस्तू

प्रक्रिया केलेले पदार्थ

घरगुती वस्तू( ज्या वस्तूंवर १२ टक्के जीएसटी लागणारे)

या बदलाचा थेट परिणाम मध्यमवर्गीय आणि सामान्य ग्राहकांवर होणार आहे. कारण दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू या श्रेणीत येतात.

२८ टक्के स्लॅबमधील कोणत्या वस्तू १८ टक्के स्लॅबमध्ये येतील

दुचाकी आणि कार (विशेषत:छोटे वाहन आणि एंट्री लेव्हलचे मॉडल)

सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियल

फ्रिज, वॉशिंग मशीन, एअर कंडीशनर , टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dilip Prabhavalkar: वयाच्या ८१ व्या वर्षी दिलीप प्रभावळकरांचे दमदार ॲक्शनसीन्स; 'दशावतार'मध्ये साकारली तब्बल ११ पात्र

Viral Video: एकमेकांची कॉलर पकडली अन् बेंचवर धरून आपटलं, भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांची तुफान हाणामारी

Jalna : बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासी समाजाचा विरोध; जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Kolhapuri chicken masala recipe: घरच्या घरी तयार करा झणझणीत कोल्हापूरी चिकन मसाला, रेसिपी लिहून ठेवा

Beed Crime : बीडमध्ये पत्नीकडून पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण, अवघड जागी मार लागल्याने पतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT