Tata Punch  Saam Tv
बिझनेस

Best SUV Under 6 Lakh: जबरदस्त फिचर्स, आकर्षक लूकसह टाटाची बजेट फ्रेंडली एसयूव्ही आणा घरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Budget Friendly SUV Under 6 Lakh:

बाजारात अनेक नवनवीन कार लाँच होत आहेत. सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची बाजारात क्रेझ आहे. या कारची किंमत इतर कारच्या तुलनेत जास्त असते. फुल साइज एसयूव्ही कारची किंमत १० लाखांपासून सुरु होते. त्यामुळे अनेकांना ही कार घेणे परवडत नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्ही बजेटमधील एसयूव्ही कारची माहिती देणार आहोत. मायक्रो एसयूव्ही कारची सध्या बाजारात खूप जास्त मागणी आहे. तुम्ही ६ लाखांच्या किंमतीत टाटा पंच एसयूव्ही विकत घेऊ शकतात. (Latest News)

किंमत

वाहन कंपन्यांमध्ये टाटा ही नावाजलेली कंपनी आहे. ग्राहक कार घेताना टाटा कंपनीच्या वाहनांना प्राधान्य देतात. कंपनीची टाटा पंच ही कार लहान नेक्सॉन म्हणून प्रसिद्ध आहे. आकर्षक लूकसह ही कार बाजारात उपलब्ध आहे. या एसयूव्हीची किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होते. या कारच्या टॉप मॉडेलची किंमत १०.१० लाखांपर्यंत असते. हा कार ३३ प्रकार आणि ९ वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे.

टाटा पंचमध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहे. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, लेदर रॅप्ड फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, स्टेयरिंग माउंटेड कंट्रोल, सिटी आणि इको ड्राइव्ह मोड, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट हे फिचर्स देण्यात आले आहे. कारमध्ये २ एअरबॅग्ज, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, चाइल्ड लॉक, एबीस, ईबीडी, रिअर पार्किंग सेन्सर देण्यात आला आहे.

टाटा पंचमध्ये १.२ लीटर नॅचरल एस्पिरेटेड 3 सिलेंडर रेवेट्रॉन  इंजिन देण्यात आले आहे. या कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. कार २० किमी प्रती लिटरपेक्षा जास्त मायलेज देते असा दावा कंपनीने केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT