Belated ITR Saam Tv
बिझनेस

Belated ITR: उशिराने आयटीआर भरताय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप, किती लागतो दंड

Belated ITR Filling Process: ज्या करदात्यांनी ३१ जुलैपर्यंत आयटीआर फाइल केला नाही ते करदाते आता बिलेटेड आयटीआर फाइल करु शकतात. बिलेटेड आयटीआर फाइल कसा करायचा ते जाणून घ्या.

Siddhi Hande

आयटीआर फाइल केल्यानंतर आता सर्वजण रिफंड कधी येणार याची वाट पाहत आहे. आयटीआर फाइल केल्यानंतर ४-५ आठवड्यात करदात्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतात. परंतु ज्या लोकांनी आयटीआर फाइल केला नाही त्यांना दंड भरावा लागेल. ज्या करदात्यांनी इन्कम टॅक्स फाइल केला नाही.ते करदाते अजूनही इन्कम टॅक्स फाइल करु शकतात. याला बिलेटेड रिटर्न म्हणतात.

बिलेटेड रिटर्न फाइल करण्यासाठी दंड भरावा लागेल. त्याचसोबत टॅक्सवर व्याजदेखील द्यावे लागेल. बिलेटेड आयटीआर(Belated ITR) फाइल करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

बिलेटेड आयटीआर कोण फाइल करु शकतं? (Who Can File Belated ITR)

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ होती. ज्या करदात्यांनी मुदतीआधी आयटीआर फाइल केला नाही ते करदाते बिलेटेड आयटीआर (Belated ITR)फाइल करु शकतात.

बिलेटेड आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख काय? (Belated ITR Filling Last Date)

बिलेटेड आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. म्हणजेच तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत आयटीआर फाइल करु शकतात.

दंड

बिलेटेड आयटीआर फाइल करण्यासाठी इन्कम टॅक्स कलम 234Fअंतर्गत दंड भरावा लागेल. जर करदात्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये असेल तर तुम्हाला १००० रुपयांचा दंड भरावा लागेल. तसेच तुमचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. याचसोबत तुम्हाला टॅक्सवरील व्याज द्यावे लागेल.

बिलेटेड आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस (Belated ITR Filling Process)

बिलेटेड आयटीआर करण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे. जसा तुम्ही आयटीआर फाइल केला त्याच पद्धतीने बिलेटेड आयटीआर फाइल करायचा आहे. यासाठी तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल. पोर्टलवर तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुमचे अकाउंट लॉग इन करावे लागेल. यानंतर तुमच्या उत्पन्नाप्रमाणे आयटीआर फॉर्म सिलेक्ट करावा लागेल. यानंतर तुमचे उत्पन्न, डिडक्शन अशी सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला आयटीआर सबमिट करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

SCROLL FOR NEXT