Customers wait outside a bank as banking services remain affected due to strike call by bank unions. saam tv
बिझनेस

Bank Strike: सलग तीन दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प; काय आहे कारण, कधी असणार बँका बंद?

Banks Closed for 3 Days : जानेवारीच्या अखेरीस बँकां बंद राहणार आहेत. भारतातील बँकिंग सेवा सलग तीन दिवस बंद राहतील. आठवड्यातील दोन दिवस हवी या मागणीसाठी बँक अधिकाऱ्यांना संपाचे हत्यार उपासलंय.

Bharat Jadhav

  • जानेवारीच्या अखेरीस सलग तीन दिवस बँकिंग सेवा ठप्प

  • बँक कर्मचाऱ्यांचा ५-डे वीकसाठी आक्रमक पवित्रा

  • २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी बँक संपाचा इशारा

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असतील, तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातील तीन दिवस बॅकिग सेवा बंद राहणार आहेत. कधी आणि का बँकिंग सेवा बंद राहणार हे जाणून घेऊ. बँकांमध्ये '५-डे वीक' (आठवड्यातून केवळ ५ दिवस काम) लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. ही मागणी मान्य न झाल्यास २७ जानेवारी २०२६ रोजी देशभरात बँक संप पुकारण्याचा इशारा दिलाय.

या संपामुळे सलग तीन दिवस बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झालीय. बँक कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रमुख संघटनांची शिखर संस्था असलेल्या 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स'ने हा संपाचा इशारा दिलाय. संपामुळे ग्राहकांसाठी ही मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

बँका कधी असणार बंद?

२५ जानेवारी : चौथा शनिवार (बँकेला सुट्टी)

२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन (सार्वजनिक सुट्टी)

२७ जानेवारी : प्रस्तावित देशव्यापी बँक संप

जर हा संप झाला तर शनिवार ते सोमवार असे सलग तीन दिवस बँका बंद राहतील. यामुळे चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार आणि कर्जविषयक कामांना विलंब होईल. बँक कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी मिळते. मात्र केंद्र सरकारी कर्मचारी आणि कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणेच बँकांमध्येही सर्व शनिवारी सुट्टी द्यावी आणि ५ दिवसांचा आठवडा' लागू करावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल आणि 'वर्क-लाइफ बॅलन्स' सुधारेल, असा युक्तिवाद युनियनकडून करण्यात येत आहे.

या गोष्टी ठेवा लक्षात

रोख रक्कम भरणे किंवा काढणे, पासबुक एन्ट्री आणि ड्राफ्ट बनवणे यांसारखी कामे ठप्प होतील.

जे ग्राहक आजही इंटरनेट बँकिंगऐवजी प्रत्यक्ष बँकेत जाण्यावर अवलंबून आहेत, त्यांची गैरसोय होईल.

यूपीआय, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू राहतील. मात्र तांत्रिक अडचण आल्यास त्याचे निराकरण होण्यास विलंब लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; VIDEO समोर

BMC Election 2026: मुंबई निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? किती आहे एकूण मालमत्ता?

Accident : उज्जैनला जाताना काळाचा घाला, ३ जणांचा जागेवरच मृत्यू, जळगावात घाटात गाडीवर नियंत्रण सुटले अन्...

2026 मध्ये WhatsApp चॅटिंगचा अंदाज बदलणार; जे लिहू त्याचा Sticker बनेल, आताच जाणून घ्या 3 स्मार्ट फीचर्स

मुदत संपली,आता HSRP नंबरप्लेट बसवता येणार का? खर्च किती होणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT