Bank Closed Today Saam Tv
बिझनेस

Bank Closed Today: आज बँकांचाही संप; SBI, HDFC ते PNB... कोणत्या बँका सुरु, कोणत्या बंद? वाचा यादी

Bank Strike Today News: आज बँकानी संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक बँका आज बंद राहणार आहेत. त्यामुळे जर बँकेत काही काम असेल तर ही यादी नक्की वाचा.

Siddhi Hande

आज बँकांचा संप

या बँका राहणार बंद

बँकेत जाण्याआधी ही माहिती नक्की वाचा

आज १२ फेब्रुवारी रोजी देशातील १० मोठ्या केंद्रिय ट्रेड युनियनने संपाची हाक दिली आहे. यामध्ये अनेक बँकांचाही समावेश आहे. बँक युनियननेदेखील संपाची हाक दिली आहे. त्यामुळे अनेक बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. यामुळे आज राज्यातील अनेक बँकां बंद असणार आहे.त्यामुळे जर तुमचे बँकेत काही काम असेल तर तुमची ब्रँच सुरु आहे की नाही हे एकदा चेक करा.

बँकांच्या संपामुळे कोणत्या बँका बंद राहणार आणि कोणत्या बँका सुरु आहेत, याबाबत संभम निर्माण झाला आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी ही माहिती वाचा.

बँक ऑफ बडोदाने एक्सचेंज फायलिंगमध्ये याबाबत माहिती दिली आहे. बँक यूनियनच्या संपामुळे अनेक सर्व्हिसवर परिणाम होऊ शकतो.यामुळे देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कामावर परिणाम होणार आहे. याचसोबत आयडीबीआय बँकेच्या सेवेवरदेखील परिणाम होणार आहे.

आज बँका बंद असणार?

बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑफ इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाने संपाची घोषणा केली आहे. बँक ऑफ बडोदाने सांगितले की, ते त्यांच्या शाखा आणि कार्यालयांचे कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी महत्त्वाची पाऊले उचलत आहेत. संप झाल्यास त्यांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

स्टेट बँकेच्या म्हणण्यांनुसार, बँकेचे कामकाज तसेच सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. परंतु सेवांमध्ये विलंब होऊ शकतो. संपामुळे सेवांवर परिणाम होऊ शकतो.

आयडीबीआय बँकेलाही कामगार संघटनांकडून सूचना मिळाली आहे. बँकेने म्हटलंय की, संपादरम्यान, कामावर परिणाम होऊ शकतो. पंजाब नॅशनल बँकेचेही कर्मचारी सहभागी होऊ शकतात.

या बँका राहणार सुरु

मिडिया रिपोर्टनुसार, फक्त सरकारी बँकांचे कर्मचारी या संपात सहभागी होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने सुट्टी जाहीर केलेली नाही. त्यामुळे एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस बँकेचे कामकाज सुरु राहण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Rule Change : आरबीआयनं नियम बदलले, ऑटो-पेमेंटची ती अट कायमची बंद, वाचा सविस्तर

FIR against minister: गृहमंत्र्यांवर FIR दाखल करा, कोर्टाचे आदेश; कबड्डी सामन्यात लावली होती ५०० रुपयांची पैज

Health Care: सतत थकवा, अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होतोय? मग शरीरात असू शकते ‘ही’ कमतरता; वेळीच व्हा सावधान

Badlapur News: नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा; राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरीतुमरी

Maharashtra News Live Update: नारा नदी पुलाखाली आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

SCROLL FOR NEXT