Bank Holidays Google
बिझनेस

Bank Holiday in November : नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी...

Bank Holiday in November Update : नोव्हेंबर महिन्यात ९ ते १० दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे. वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Vishal Gangurde

नोव्हेंबर महिन्यात ९ ते १० दिवस बँका बंद राहणार

५ नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा या दिवशी देशभरात सुट्टी

रविवारी आणि दुसरा-चौथा शनिवार या दिवशी सर्वत्र बँका बंद राहणार

ग्राहकांनी बँकेची कामे सुट्टीपूर्वी पूर्ण करावी

नोव्हेंबर महिन्यात कोणतेही मोठे सण नाहीत. तरीही या महिन्यात ९ ते १० दिवस बँका बंद राहणार आहेत. ५ नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती आहे. तर त्याच दिवशी कार्तिक पोर्णिमा आहे. या दिवशी देशातील बहुतेक बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात खातेदारकांना वेळेचं नियोजन करून बँकेतील कामे पूर्ण करावी लागतील.

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील? जाणून घ्या यादी

नोव्हेंबर महिन्यात इगास-बग्वालच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरु आणि देहरादूनमध्ये बँका बंद राहतील.

नोव्हेंबरमध्ये २ तारखेला रविवारी असल्याने संपूर्ण देशातील बँका बहंद राहतील.

५ नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती/कार्तिक पोर्णिमा/रहस पोर्णिमेच्या दिवशी संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

७ नोव्हेंबर रोजी वंगाला महोत्सवानिमित्त शिलाँगमधील बँका बंद राहतील.

८ नोव्हेंबर रोजी दुसरा शनिवार असल्याने संपूर्ण देशात बँका बंद राहतील. तसेच कनकदास जयंतीनिमित्त बेंगळुरमध्ये बँका बंद राहतील.

९ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

१६ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने संपूर्ण देशात बंद राहतील.

२२ नोव्हेंबर रोजी चौथा शनिवारी असल्याने संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

२३ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने संपूर्ण देशातील बँका बंद राहतील.

३० नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने संपूर्ण देशातील बँका बंद राहतील .

सुट्ट्यांमुळे काय परिणाम होईल?

बँकांच्या सुट्ट्यांच्या दिवशी चेक क्लिअर करणे, पासबुक अपटेड किंवा पैसे काढण्याची सोय उपलब्ध होणार नाही. मात्र, डिजिटल बँकिंग चॅनल- मोबाइल अॅप, नेट बँकिंग आणि एटीएम सारख्या सुविधा सुरु राहतील. कर्ज परतफेड, रिकरिंग डिपॉजिट कपात किंवा गुंतवणुकीची परिपक्वता या सारख्या गोष्टी सुट्टीच्या दिवशी येत असल्यास आरबीआयच्या मार्गदर्शकाच्या तत्वानुसार या प्रक्रिया सहसा पुढील कामकाजाच्या दिवशी केली जाईल. शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळण्याठी ग्राहकांनी सुट्टीच्या आदल्या दिवशी बँकामधील कामे पूर्ण करावी. तुम्हाला पैसे हवे असल्यास ऑनलाइन बँकिग आणि एटीएमच्या सुविधाचा वापर करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT