Bank Holiday News GOOGLE
बिझनेस

Bank Holiday News: पुढील आठवड्यात सलग 4 दिवस बँका बंद; SBI, HDFC सह सर्व बँकांच्या ग्राहकांनी आधीच तपासा सुट्ट्यांची यादी

RBI Holiday Calendar : पुढील आठवड्यात २५ ते २८ जूनदरम्यान अनेक शहरांमध्ये बँका सलग चार दिवस बंद राहू शकतात. आयबीआयच्या सुट्टी कॅलेंडरनुसार ग्राहकांनी महत्वाची कामे आधीच पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Sakshi Sunil Jadhav

तुम्हाला पुढच्या आठवड्यात बँकेशी संबंधित कोणतेही व्यवहार करायचे तर थांबा. ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्टीच्या कॅलेंडरनुसार २२ जून ते २८ जून २०२६ या दिवसांमध्ये देशामधल्या काही भागांमध्ये बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकत जाण्याआधी तुमच्या शहरातल्या सुट्ट्यांची माहिती तपासून घेणे आवश्यक आहे.

RBI ने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात राष्ट्रीय, धार्मिक आणि प्रादेशिक सणांमुळे दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यामुळे एकूण ११ दिवस बँकांना सुट्टी आहे. यामध्ये २५ जूनपासून २८ जूनपर्यंतचा कालावधी विशेष लक्षात घेण्यासारखा आहे.

२५ जून रोजी मोहरमच्या निमित्ताने विजयवाडा या भागात बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर २६ जून रोजी देशातल्या बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये बँकांचे कामकाज बंद असेल. मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, लखनऊ, पटना, नागपूर, जम्मू, श्रीनगर, रायपूर, रांची आणि इतर अनेक शहरांमध्येही याचा समावेश आहे.

२७ जून रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातल्या सर्व सरकारी आणि खासगी बँका बंद राहतील. त्यानंतर २८ जून रोजी रविवार असल्यामुळे नियमित साप्ताहिक सुट्टी असेल. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी सलग चार दिवस बँक शाखांचे कामकाज बंद राहू शकता.

दरम्यान २९ जून रोजी संत गुरु कबीर जयंतीनिमित्त शिमला या ठिकाणी बँका बंद राहतील तर ३० जून रोजी रेमना नी या सणानिमित्त आयझॉलमध्ये बँकांना सुट्टी असेल. बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना फारशी अडचण येणार नाही. इंटरनेट बँकिंग, ऑनलाइन पेमेंट, युपीआय Google Pay, PhonePe, Paytm यांसारख्या डिजिटल सेवा सुरळीत सुरु राहतील. तसेच एटीएम सेवाही उपलब्ध असतील. त्यामुळे रोख रक्कम काढणं, पैसे पाठवणं किंवा ऑनलाइन व्यवहार करताना तुम्हाला अडचणी येणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

Maharashtra News Live Update:घोडबंदर रोडवरील काँक्रिटीकरणामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 25 किमीपर्यंत वाहतूक कोंडी

Skin Care: फक्त 20 मिनिटांत मिळवा सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन; घरी तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरून पाहा

मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; सरकारकडून पीडितांना 40 लाखांची मदत

आणखी एक पक्ष फुटणार? भाजपकडून आमदारांना मंत्रिपदासह ३० कोटींची ऑफर; आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT