Bank Holidays Saam Tv
बिझनेस

Bank Holidays In June: जून महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद; RBI ने जारी केली सुट्ट्यांची यादी

Bank Holidays In June 2025: जून महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे जर तुमचे बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी बघून जा.

Siddhi Hande

जून महिना सुरु होणार आहे. जून महिन्यात जर तुमचे बँकेत काही काम असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. जून महिन्यात अनेक दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे तुमचे बँकेच्या ब्रँचमध्ये काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी नक्की वाचून जा. रिझर्व्ह बँक दर महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. जून महिन्यात एकूण १२ दिवस बँका बंद असणार आहेत.यामध्ये वीकेंड आणि सणावाराच्या सुट्ट्या असणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने जारी केली सुट्ट्यांची यादी

रिझर्व्ह बँक दर महिन्याला सुट्ट्यांची यादी जाहीर करते. वेगवेगळ्या राज्यात सणानुसार सुट्ट्या असणार आहेत. याबाबत अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे. बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असणार आहेत.

जूनमधील सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in June 2025)

  • १ जून (रविवार)- सर्व राज्यांमध्ये बँका बंद

  • ६ जून (शुक्रवार)- ईद-उल-अजहा (केरळमध्ये बँका बंद)

  • ७ जून- शनिवर- बकरी ईद (देशात सर्व बँका बंद)

  • ८ जून- रविवार

  • ११ जून (बुधवार)- संत कबीर जयंती (हिमाचल आणि सिक्किममध्ये बँका बंद)

  • १४ जून (शनिवार)- दुसरा शनिवार (देशातील सर्व बँका बंद)

  • १५ जून (रविवार)- देशातील सर्व बँका बंद

  • २२ जून (रविवार)- सर्व बँकांना सुट्टी

  • २७ जून (शुक्रवार)- रथ यात्रा/कांग (ओडिशा आणि मणिपूरमध्ये बँका बंद)

  • २८ जून (शनिवार)- चौथा शनिवार (सर्व राज्यांमध्ये बँका बंद)

  • २९ जून (रविवार)- बँका बंद

  • ३० जून (सोमवार)- रेमना नी (मिझोराममध्ये बँकांना सुट्टी)

ऑनलाइन सर्व्हिस सुरु

जरी जून महिन्यात बँका १२ दिवस बंद असल्या तरी ऑनलाइन सर्व्हिस सुरु राहणार आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने व्यव्हार करु शकतात. तुम्हाला सुट्ट्यांमध्ये चेक क्लिअरिंग किंवा बँखेतील कामे करता येणार नाहीत. परंतु डिजिटल कामे सुरु राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Namaskar: वजन कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार किती फायदेशीर? जाणून घ्या किती कॅलरी बर्न होतात?

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; दोन बड्या IAS अधिकऱ्यांची तडकाफडकी बदली

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये खुनी सत्र सुरु, मुख्यमंत्र्यांच्या PA नंतर TMC नेत्याची हत्या

Dhurandhar 3: 'लियारीची स्टोरी अजून संपली नाही; 'धुरंधर ३'ची तयारी सुरु? निर्मात्यांनी दिली मोठी हिंट

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये सोमवारी १२ तास पाणीपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT