
एका इंजिनीअर तरुणीकडून १६.२० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या तरुणीला ३० दिवस डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आले. पैसे लुबाडल्यानंतर फसवणूक करणाऱ्या टोळीने तरुणीला कॅमेऱ्यासमोर कपडे काढायला लावले. या प्रकरणात राजस्थानच्या सीकरमधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात शाहगंज परिसरातील इंजिनीअर तरुणीला इंटरनॅशनल कॉल आला. फोन करणाऱ्या महिलेने स्वत:ची ओळख मेघा झा अशी केली. ब्लूडार्ट कुरिअर कंपनीचा प्रतिनिधी असल्याचा दावा करत तिने सिंगापूरहून एक पार्सल आल्याची माहिती इंजिनीअर तरुणीला दिला. कुरिअरमध्ये ५ पासपोर्ट, ३ क्रेडिट कार्ड, बँकेची कागदपत्रे, कपडे आणि औषधांची ५८ पाकिटे असल्याची माहिती देण्यात आली. यापैकी एकही गोष्ट मी ऑर्डर केली नाहीये असे तरुणीने म्हटले. पण तुझ्या आयडीचा गैरवापर केला जाईल अशी धमकी देण्यात आली.
काही वेळाने, एका नंबरवरुन मला व्हॉट्सअॅप कॉल आला. कथित पोलीस अधिकाऱ्याशी बोलण्यास लावले. हे प्रकरण नार्कोटिक्स आणि सीबीआयपर्यंत जाईल अशी धमकी दिली. मला घाबरवले, स्काईपवर कनेक्ट करायला लावले. तीन दिवस मी डिजिटल अरेस्टमध्ये होते. चौकशीपासून वाचण्यासाठी त्यांनी माझ्याकडे थोडे-थोडे असे १६.२० लाख रुपये घेतले, अशी माहिती तरुणीने मुंबई पोलिसांना दिली.
जेव्हा माझ्याकडचे पैसे संपले, तेव्हा त्यांनी तुझ्या शरीरावर एक टॅटू आहे, तो आम्हाला चेक करायचा आहे' असे म्हटले. त्यांनी जबरदस्तीने मला कॅमेऱ्यासमोर कपडे काढायला भाग पाडले. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्याने गुन्हा दाखल केला. ही तरुणी तब्बल ३० दिवस डिजिटल अरेस्टमध्ये होती असे म्हटले जात आहे.
तरुणीच्या तक्रारीनंतर तपासादरम्यान राजस्थानमधील सीकर येथील रवींद्र प्रसाद वर्मा यांचे नाव समोर आले. तो आणि त्याचे काही सहकारी हाँगकाँगमधील फसवणूक टोळीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली. ही टोळी लोकांची फसवणूक करुन त्यांच्या खात्यातील पैसे लंपास करते. यात टोळीला बँक खाती उपलब्ध करुन देण्याचे काम रवींद्र वर्मा आणि त्याच्या सहकाऱ्याकडे होते, अशी माहिती सायबर सेलच्या इन्स्पेक्टर रीता सिंह यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.