December 2025 Bank Holiday Google
बिझनेस

Bank Holiday in December: डिसेंबरमध्ये १९ दिवस बँका राहणार बंद, वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

December 2025 Bank Holiday Calendar: डिसेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी समोर आली आहे. आरबीआयने नुकताच सुट्ट्यांची यादी शेअर केली. १९ दिवस बँका बंद राहणार आहेत. वाचा सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट...

Priya More

Summary -

  • डिसेंबर २०२५ मध्ये विविध राज्यांमध्ये बँका १९ दिवस बंद राहणार

  • ४ रविवार, दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार या दिवशी बँका बंद असतात

  • उर्वरित सुट्ट्या राज्यनिहाय धार्मिक, सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक कारणांवर आधारित आहे

  • बँकेत जाण्याचा प्लान करत असल्यास तर आधी सुट्टीची यादी पाहा

वर्षाच्या शेवटचा महिना सुरू होण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार असे एकत्र करून डिसेंबर महिन्यात वेगवेगळ्या राज्यात १९ दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या सर्व देशभरात एकसारख्या नसतील त्या राज्यानुसार बदलतील.

डिसेंबर महिन्यामध्ये १९ दिवस बँका बंद राहतील. त्यामध्ये ४ रविवार असतील. तर दर महिन्याला बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. आरबीआयकडून अधिकृत वेबसाईटवर सुट्ट्यांची यादी शेअर करण्यात आली आहे. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि धार्मिक सणांच्या आधारे प्रत्येक राज्यात सुट्ट्या बदलात. जर डिसेंबरमध्ये तुम्ही बँकेमध्ये जाण्याचा प्लान करत असाल तर आधी बँका कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत त्याची संपूर्ण लिस्ट एकदा चेक करून जा...

डिसेंबर २०२५ मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी -

- १ डिसेंबर (सोमवार)- अरुणाचल प्रदेशात आदिवासी श्रद्धा दिन

- ३ डिसेंबर (बुधवार)- गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर पर्व

- ५ डिसेंबर (शुक्रवार)- जम्मू आणि काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला यांची जयंती

- १२ डिसेंबर (शुक्रवार)- मेघालयात पा तोगन नेंगमिंजा संगमा दिन

- १८ डिसेंबर (गुरुवार)- छत्तीसगडमध्ये गुरु घासीदास जयंती आणि मेघालयात यू सोसो थाम यांची पुण्यतिथी

- १९ डिसेंबर (शुक्रवार)- गोवा मुक्ती दिन

- २० डिसेंबर (शनिवार)- सिक्कीममध्ये लोसोंग/नामसुंग उत्सव

- २२ डिसेंबर (सोमवार)- सिक्कीममध्ये लोसोंग उत्सव

- २४ डिसेंबर (बुधवार)- मेघालय आणि मिझोराममध्ये नाताळाच्या पूर्वसंध्येला सुट्टी

- २५ डिसेंबर (गुरुवार)- नाताळची सुट्टी

- २६ डिसेंबर (शुक्रवार)- मिझोराम, तेलंगणा आणि मेघालयात नाताळ साजरा करण्यासाठी सुट्टी. हरियाणात शहीद उधम सिंह जयंती.

- ३० डिसेंबर (मंगळवार)- स्वातंत्र्यसैनिक यू किआंग नांगबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेघालयात बँका बंद राहतील

- ३१ डिसेंबर (बुधवार)- नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि इमोइनू इरत्पा सणानिमित्त मिझोरम आणि मणिपूरमध्ये बँका बंद राहतील

आठवड्याच्या शेवटी बँकांच्या सुट्ट्यांची यादी -

- ७ डिसेंबर - रविवार

- १३ डिसेंबर- शनिवार (दुसरा शनिवार)

- १४ डिसेंबर - रविवार

- २१ डिसेंबर - रविवार

- २७ डिसेंबर - शनिवार (चौथा शनिवार)

- २८ डिसेंबर - रविवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसला हत्तींच्या कळपाची धडक, इंजिन अन् ५ डब्बे रूळावरून घसरले

Mumbai Crime: मुंबई हादरली! कोल्डड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं, अल्पवयीन मुलींवर बलात्कार; अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल

Kitchen Hacks : सोफा कुशनवर डाग लागल्यास काय करावे? जाणून घ्या योग्य टिप्स

Kolhapur Tourism : पश्चिम घाटातील निसर्गरम्य ऐतिहासिक ठिकाण, हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट

Bollywood Actress : साऊथ चित्रपटात काम करणे कठीण; लोकांनी केल्या शरीरावर कमेंट्स, अभिनेत्री गेली होती ट्रॉमामध्ये

SCROLL FOR NEXT