Bank Holidays Saam Tv
बिझनेस

Bank Holidays: कामाची बातमी! देशभरात बँकांना सलग ५ दिवस सुट्टी; कारण काय?

Bank Holidays for 5 Days: बँकांना सलग ५ दिवस सुट्ट्या असणार आहेत. विविध राज्यांमध्ये ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जर बँकेत काही काम असेल तर त्याआधी सुट्ट्यांची यादी वाचा.

Siddhi Hande

देशातील बँकांना सलग ५ दिवस सुट्टी

विविध राज्यांमध्ये सुट्टी जाहीर

बँकेत काम असेल तर त्याआधी सुट्ट्यांची यादी वाचा

वर्षाचा शेवटचा महिना सुरु आहे. वर्षभरातील अनेक रखडलेली कामे करण्यासाठी ही शेवटची संधी असते. अनेकदा पैशासंबंधित अनेक कामे करायची असतात. दरम्यान, जर तुमचे बँकेत काही काम असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. डिसेंबर महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहे.

१८ डिसेंबर ते २२ डिसेंबर अशी सलग ५ दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे तुमचे जर बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी आजच चेक करु जा. अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

कुठे बँका बंद? (Bank Holidays for 5 Days)

१८ डिसेंबरला म्हणजे काल मेघालय,छत्तीसगडमध्ये बँकांना सुट्टी होती. इतर राज्यातील बँका सुरु होत्या.

१९ डिसेंबरला गोवा स्वातंत्र्य दिन म्हणून सरकारी आणि खासगी बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

२० डिसेंबर रोजी सिक्कीममध्ये बँका बंद असणार आहेत. लोसूंग आणि नामसूंग या सणांमुळे बँकेला सुट्टी दिली आहे.

२१ डिसेंबरला रविवार म्हणून देशातील सर्व बँका बंद असणार आहेत.

२२ डिसेंबरला सिक्कीममध्ये लोसूंग आणि नामसूंग या सणामुळे सुट्टी देण्यात आली आहे. २० ते २२ असे सलग ३ दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँका बंद

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अनेक दिवस बँका बंद असणार आहेत.महाराष्ट्रात २१, २५,२७ आणि २८ डिसेंबरला बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळेच जर तुमचे काही काम असेल तर त्याआधीच पूर्ण करा.

या सेवा राहणार सुरु

बँकांना सुट्टी असली तरीही ऑनलाइन कामे सुरु राहतील. तुम्हाला इंटरनेट किंवा बँकिंग अॅपवरुन सर्व कामे करता येणार आहेत. एटीएम आणि यूपीआयद्वारे डिजिटल पेमेंट सुरु राहती. एनईएफटी आणि आरटीजीएस सुविधादेखील सुरु असणार आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईलवरुन सर्व कामे करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT