उद्या राज्यातील बँका बंद
गुरु नानक जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी
ऑनलाइन कामे सुरु राहतील
अनेक कामांसाठी बँकेत जाणे गरजेचे आहे. काही कामे आपण ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या अॅपद्वारे करु शकतो. मात्र, काही कामांसाठी बँकेत जावेच लागते. दरम्यान, तुमचे उद्या बँकेत काही काम असेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या गुरु नानक जयंतीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या असणार आहेत.
उद्या कार्तिक पोर्णिमा आणि गुरु नानक जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी अनेक राज्यांमध्ये शाळांना, बँकांना सुट्ट्या असतात. दरम्यान, तुमच्या राज्यात बँकांना सुट्ट्या आहे की नाही हे चेक करा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले त्यात अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असल्याचे सांगितले आहे.
या राज्यातील बँका उद्या बंद (Bank Closed in These State Tommorow)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या यादीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड, झारखंड आणि हिमाचल प्रदेशमधील बँका बंद राहणार आहेत. या राज्यांमध्ये गुरु नानक जयंती साजरी केली जाते.
आठवड्यात बँका किती दिवस बंद राहणार?
६ नोव्हेंबर- नोंगक्रेम नृत्य महोत्सवानिमित्त मेघालयात बँक बंद, बिहारमध्ये निवडणुकीनिमित्त बँक बंद
७ नोव्हेंबर- मेघालयात वांगला महोत्सवानिमित्त सुट्टी
८ नोव्हेंबर- देशातील सर्व बँकांना दुसऱ्या शनिवारनिमित्त सुट्टी
दरम्यान, बँकांना जरी सुट्टी असली तरीही बँकांची ऑनलाइन कामे सुरु असतील. तुम्ही बँकेच्या डिजिटल सेवेचा वापर करु शकतात. याचसोबत यूपीआय आणि एटीएमचा वापर करु शकतात. यामुळे तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी आणि बिल भरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.