Bank Holiday Saam Tv
बिझनेस

Bank Holiday: राज्यात बँकांना सलग ६ दिवस सुट्ट्या; महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays for 5 Days: बँकेत काम असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. या आठवड्यात तब्बल ५ दिवस बँका बंद असणार आहे. विविध राज्यांमध्ये बँकांना वेगवेगळ्या दिवशी सुट्टी असणार आहे.

Siddhi Hande

या आठवड्यात ५ दिवस बँकांना सुट्टी

वेगवेगळ्या राज्यात विविध कारणांसाठी

जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

बँकेत काही काम असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. या आठवड्यात बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असणार आहे. बँकांना जवळपास ५ दिवस सुट्ट्या असणार आहे. त्यामुळे जर तुमचे बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी नक्की चेक करुन जा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली होती. त्यानुसार या आठवड्यात महावीर जयंती, गुड फ्रायडे आणि आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे बँका बंद असणार आहे. विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँकांना सुट्ट्या असणार आहे. त्यामुळे तुम्ही बँकांच्या सुट्ट्यांची यादी वाचा.

३० मार्च ते ५ एप्रिलपर्यंत बँकांना सुट्ट्या (Bank Holidays from 31st March to 5 April 2026)

रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, ३० मार्च ते ५ एप्रिलपर्यंत अनेक दिवस बँकांना सुट्ट्या असणार आगे.

३० मार्च (Bank Holiday List)

आज महावीर जयंतीनिमित्त कर्नाटकमध्ये बँका बंद असणार आहे.

३१ मार्च

महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, तामिळनाडू, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये बँकांना सुट्ट्या असणार आहेत.

१ एप्रिल

१ एप्रिलला आर्थिक वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे बँकांच्या वार्षिक क्लोजिंगमध्ये २० पेक्षा जास्त राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, तमिळनाडूत बँका बंद असणार आहेत.

२ एप्रिल

मोंडी थर्सडेनिमित्त केरळ, कोची आणि तिरुवनंतपुरममधील बँकांना सुट्टी असणार आहे.

३ एप्रिल

३ एप्रिल रोजी गुड फ्रायडेनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, नागालँड, तामिळनाडू, केरळ अशा अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे.

५ एप्रिल

५ एप्रिलला रविवार असल्याने देशातील सर्व खाजगी आणि सरकारी बँका बंद असणार आहे.

या आठवड्यात शनिवारी बँका सुरु असणार आहे. महिन्यातील पहिला शनिवार असल्याने बँका सुरु राहणार आहेत. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Flood : गडचिरोलीत पावसाचा कहर! पर्लकोटा नदीला महापूर, भामरागड शहराला पुराचा वेढा; अनेक रस्ते पाण्याखाली

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनाला यंदा विलंब; भरती-ओहोटी आणि भव्य मिरवणुका ठरल्या कारणीभूत

Face Care: उन्हामुळे चेहऱ्याची चमक गेली? 'या' घरच्या पद्धतीने ५ मिनिटांत त्वचा होईल ग्लोइंग

Phlegm : छाती-फुफ्फुसांमध्ये साचलेला कफ मिनिटांत पडेल बाहेर, करा 'हे' ३ आजीच्या बटव्यातील सोपे उपाय

Sukanya Samriddhi Yojana: दरमहा ₹1,500 गुंतवा; मुलीच्या नावावर जमा होईल ₹8.31 लाखांचा फंड

SCROLL FOR NEXT