Bank Holiday In August Google
बिझनेस

Bank Holiday In August: ऑगस्ट महिन्यात तब्बल १३ दिवस बँका राहणार बंद; महत्वाची कामे आताच उरकून घ्या, वाचा सुट्ट्यांची यादी...

Bank Holiday In August 2024: ऑगस्ट महिन्यात जर तुमचे बँकेत काही महत्त्वाचे काम असेल तर सुट्ट्यांची यादी नक्की चेक करा. ऑगस्ट महिन्यात जवळपास १३ दिवस बँका बंद असणार आहेत.

Siddhi Hande

ऑगस्ट महिना सुरु व्हायला अवघे काही दिवस उरले आहे. ऑगस्ट महिन्यात जर तुमचे बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी नक्की पाहून जा. ऑगस्ट महिन्यात जवळपास १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुमचे बँकेत काही काम असेल तर बँकेचे वेळापत्रक फॉलो करा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट महिन्यातील बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

ऑगस्ट महिन्यात २ मोठे वीकेंड आहेत. त्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे. त्याचसोबत विविध राज्यातील सण-समारंभानुसार सुट्ट्या असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार आहेत.

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी

  • ४ ऑगस्ट- ४ ऑगस्ट रोजी रविवार असणार आहे. त्यामुळे ४ ऑगस्टला देशभरातली बँका बंद राहणार आहेत.

  • १० ऑगस्ट- १० ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार असल्याने देशभरातली बँका बंद राहणार आहे.

  • ११ ऑगस्ट- ११ ऑगस्ट रोजी रविवार असल्याने देशभरातली सर्व बँकाना सुट्टी असणार आहे.

  • १५ ऑगस्ट- १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे देशात राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात येते. या दिवशी देशभरातली बँका बंद राहणार आहेत.

  • १८ ऑगस्ट- १८ ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँकेला बँकेला सुट्टी असणार आहे.

  • १९ ऑगस्ट- १९ ऑगस्टला देशभरातील अनेक राज्यात रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे उत्तराखंड, दमण आणि दीव, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात, चंदीगढ आणि उत्तर प्रदेशमध्ये बँका बंद राहणार आहे.

  • २४ ऑगस्ट- २४ ऑगस्ट हा महिन्यातील चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.

  • २५ ऑगस्ट-२५ ऑगस्टला रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.

  • २६ ऑगस्ट- २६ ऑगस्टला जन्माष्टमी आहे. जन्माष्टमीसाठी देशभरातली अनेक राज्यातील बँकाना सुट्टी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

SCROLL FOR NEXT