Bank Holidays Saam Tv
बिझनेस

Bank Holiday: १ मे रोजी देशातील सर्व बँका बंद; RBI ने का दिली सुट्टी?

1st May 2026 Bank Holiday or Not: उद्या १ मे रोजी देशातील बँकांना सुट्टी असणार आहे. १ मेला बौद्ध पौर्णिमा आणि कामगार दिन साजरा केला जातो. त्यामुळे देशात बँकांना सुट्टी असणार आहे.

Siddhi Hande

उद्या देशातील सर्व बँकांना सुट्टी

१ मे रोजी कामगार दिनानिमित्त सुट्टी

बँकांना सुट्टी तरी डिजिटल सेवा सुरु असणार

उद्यापासून मे महिना सुरु होणार आहे. मे महिन्याचा पहिला दिवस उद्या आहे. मे महिन्याच्या पहिल्या दिवशी बँकांना सुट्टी असणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, उद्या देशातील अनेक राज्यातील बँका बंद असणार आहेत. उद्या शेअर मार्केटदेखील बंद असणार आहे.

उद्या NSE-BSE वरदेखील ट्रेडिंग होणार नाहीये. रिझर्व्ह बँकेने उद्या देशातील अनेक राज्यांमध्ये बँक हॉलिडे जाहीर केला आहे. यामागे वेगवेगळी कारणे आहे.

शुक्रवारी १ मे २०२६ रोजी बौद्ध पोर्णिमा आणि कामगार दिवस आहे. त्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे. सरकारी आणि प्रायव्हेट सेक्टरमधील बँका बंद असणार आहे. दरम्यान, बँका जरी बंद असल्या तरी डिजिटल बँकिंग सेवा सुरु राहणार आहे. सुट्टीच्या दिवशीही यूपीआय, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एटीएम सेवा सुरु राहणार आहे.

१ मे रोजी बौद्धपोर्णिमा साजरा केली जाते. याचसोबत कामगार दिवसदेखील आहे. कामगारांना त्यांच्या योगदानासाठी आणि अधिकारासाठी हा दिवस साजरा केला जातो. तेव्हापासून या दिवशी राज्यात सुट्टी असते.

मे महिन्यातील इतर सुट्ट्या (Bank Holidays in May 2026)

१ मे- महाराष्ट्र दिन

३ मे- रविवार

९ मे- दुसरा शनिवार

१०मे-रविवार

१६ मे- काही राज्यांमध्ये राज्यदिवसनिमित्त सुट्टी

१७ मे- रविवार देशभरातील बँकांना सुट्टी

२३ मे- चौथा शनिवार

२४ मे- रविवार

२६ मे- काजी नजरुल इस्लाम जयंतीनिमित्त काही राज्यात बँका बंद

२८ मे- बकरी ईद

३१ मे- रविवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : सोन्याचे दर आज कमी झाले की वाढले? पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K,१८K गोल्ड रेट

Navi Mumbai: मुंबई-डोंबिवलीचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, ऐरोली-काटई उन्नत मार्ग या दिवशी होणार सुरू, वाचा महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळली

Shocking : भयंकर! पतीने फोन चेक केला; पत्नीने छातीवर बसून ओढणीने आवळला गळा, सासूने दार उघडलं अन्...

पुणेकरांची चिंता वाढली! पाऊस सुरू असूनही 'या' धरणांनी तळ गाठला; तुमच्या भागाला पाणी पुरवणाऱ्या धरणाची काय स्थिती?

SCROLL FOR NEXT