Bank Employees Will Go On Strike For 13 Days Know Strike Reason - Saam TV  Bank Employees Strike - Saam Tv
बिझनेस

Bank Employees Strike: बँक कर्मचारी १३ दिवस जाणार संपावर; जाणून घ्या संपाचं कारण

Bharat Jadhav

Bank Employees Strike:

देशातील विविध बँकांचे कर्मचारी १३ दिवस संपावर जाणार आहेत. इंडिया बँक एम्प्लॉईज युनियनने याबाबत अधिसूचना जारी केलीय. या अधिसूचनेनुसार ४ डिसेंबर ते २० जानेवारी या कालावधीत विविध तारखांना हा संप करण्यात येणार आहे. (Latest News)

बँक कर्मचाऱ्यांनी तीन मागण्यांसाठी संपाचे अस्त्र उगारलं आहे. सर्व बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात स्टाफची नियुक्ती करण्यात यावी. बँकांमधील कायमस्वरूपी नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग बंद करण्यात यावे. आउटसोर्सिंगशी संबंधित सेटलमेंटमधील तरतुदी आणि त्याचे उल्लंघन थांबवावे, या मागण्यांसाठी इंडिया बँक एम्प्लॉईज युनियनने संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणत्या बँकेचा संप कोणत्या दिवशी असेल?

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज युनियनच्या अधिसूचनेनुसार, डिसेंबर ते जानेवारी या सर्व तारखांना विविध बँकांमध्ये अखिल भारतीय संपावर असतील.

४ डिसेंबर – PNB, SBI आणि पंजाब अँड सिंध बँकेचे कर्मचारी संपावर असतील .

५ डिसेंबर- बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया

६ डिसेंबर- कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया

७ डिसेंबर- इंडियन बँक आणि युको बँक

८ डिसेंबर- युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र

११ डिसेंबर- खासगी बँकांचा संप

जानेवारीत दिवशी असणार संप

  • २ जानेवारी- तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपमधील सर्व बँकांचे कर्मचारी संपावर असतील.

  • ३ जानेवारी- गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर, दमण आणि दीवमधील सर्व बँकांमध्ये संप असेल.

  • ४ जानेवारी- राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील सर्व बँकांमध्ये संप.

  • ५ जानेवारी- दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश राज्यातील बँक कर्मचारी असतील संपावर

  • ६ जानेवारी- पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील बँक कर्मचारी संपावर असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेत नेमकं गणित

SA vs IRE: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! तिसऱ्या वनडेतून स्टार खेळाडू बाहेर

Bigg Boss Marathi 5 च्या ग्रँड फिनालेला आर्याला नो एन्ट्री? काय आहे कारण? वाचा...

Bigg Boss Marathi Grand Finale : ग्रँड फिनालेमध्ये सूरजची झापुक झुपुक स्टाईल, पाहा Photo

India Travel: सर्पमित्रांसाठी निसर्गाचा सुंदर नजारा, 'या' ठिकाणाला एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT