Bajaj Bike Saam Tv
बिझनेस

CNG Bike: पेट्रोल, इलेक्ट्रिक बाईकनंतर आता लवकरच लाँच होणार CNG बाईक; जाणून घ्या

Bajaj Bike: ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज ही नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमी नवनवीन बाईक लाँच करत असते. कंपनी लवकरच सीएनजी सेगमेंटमध्ये नवीन बाईक लाँच करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bajaj CNG Bike About To Launched In 2025:

ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज ही नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमी नवनवीन बाईक लाँच करत असते. कंपनी लवकरच सीएनजी सेगमेंटमध्ये नवीन बाईक लाँच करणार आहे. (Latest News)

बजाज कंपनीची चेतक बाजारात जास्त वेळ टिकली नाही. कंपनीच्या इलेक्ट्रिक मॉडेलला ग्राहकांनी पसंती दर्शवली नाही. यानंतर कंपनी आता सीएनजी सेगमेंटमध्ये नवीन बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे.

काही दिवसांपूर्वी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी याबाबत माहिती दिली आहे. नवीन पल्सरसोबत कंपनी CNG बाईक लाँच करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कंपनीची सीएनजी बाईक लवकरच बाजारात उपलब्ध होईल असे दिसत आहे. कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

कंपनीने २००६ मध्ये या बाईकबाबत माहिती दिली होती. कंपनीने सांगितले होते की, कंपनी आपल्या नवीन प्रोडक्टवर काम करत आहे. ही बाईक पेट्रोलशिवाय सीएनजी व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध होईल. या बाईकमध्ये ड्युअल फ्लुअल टेक्नॉलॉजी वापरण्यात येणार आहे. ही बाईक अजूनही बाजारात लाँच झालेली नाहीये. मात्र, आता पुन्हा बजाज कंपनी सीएनजी व्हेरियंटमध्ये बाईक लाँच करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहे. मीडिया रिपोर्टनुसार,कंपनी २०२४-२५ मध्ये 110cc सीएनजी बाईक लाँच करु शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT