Baal Aadhaar Card Saam tv
बिझनेस

Baal Aadhaar Card: लहान मुलांचे आधार कार्ड कसं बनवायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Baal Aadhaar Card: ५ वर्षांखालील मुलांचे आधार कार्ड बनवू शकतात. याला बाल आधार कार्ड म्हणतात. यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

५ वर्षांखालील मुलाचे बाल आधार कार्ड

लहान मुलांसाठी आधार कार्ड कसं बनवायचं?

अशा पद्धतीने करा अर्ज

प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच आधार कार्ड असते. दरम्यान, पाच वर्षांपेक्षा लहान मुलांचेही आधार कार्ड काढतात. त्यासाठी वेगळी प्रोसेस असते.

पाच वर्षांखालील लहान मुलांचे जे आधार कार्ड असते त्याला बाल आधार कार्ड म्हणतात. यामध्ये लहान मुलाचे नाव, जन्मतारीख आणि लिंग याबाबत माहिती असते.हे आधार कार्ड त्यांच्या आईवडिलांच्या आधार कार्डशी लिंक असते. यामध्ये मुलांच्या बायोमॅट्रिकची गरज नसते.

पासपोर्टला आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहेत. यासाठीच लहान मुलांचे आधार कार्ड काढणे गरजेचे असते. तुम्ही आधार कार्ड कसं बनवायचं ते जाणून घ्या.

बाल आधार कार्ड कसं बनवायचं? (Baal Aadhaar Card Application Process)

तुम्ही अधिकृत आधार सेवा केंद्रावर जाऊन बाल आधार कार्ड बनवू शकतात. याचसोबत अनेक सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येही मुलाच्या जन्मावेळी आधार कार्ड काढण्याची सुविधा असते. यामध्ये मुलांच्या जन्माचा दाखला आणि आधार कार्ड काढू शखतात.

अर्ज कसा करावा?

तुम्ही UIDAI वेबसाइटवर जावे.

यानंतर My Aadhaar वर जावे. त्यानंतर Book an Appointment वर क्लिक करा.

यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. यानंतर ओटीपीद्वारे वेरिफाय करा.

यानंतर तुम्हाला आधार सेवा केंद्रात जातानाची तारीख निवडायची आहे.

यानंतर त्या दिवशी तुम्हाला आधार केंद्रावर जाऊन सर्व माहिती भरायची आहे. संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुमचे आधार कार्ड दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल किंवा तुम्ही UIDAI वेबसाइटवर जाऊन डाउनलोड करावे.

ऑफलाइन प्रोसेस

तुम्ही जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जावे.

यानंतर फॉर्म भरावेत आणि मुलांचे कागदपत्रे भरा.

यानंतर पालकांच्या बायोमॅट्रिक आणि आधारबाबत माहिती द्या.

यानंतर तुम्हाला acknowledgment स्लीप मिळेल. यात एनरोलमेंट आयडी मिळणार आहे.

यानंतर तुम्हाला ६० ते ९० दिवसात बाल आधार आयडी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT