e-Aadhaar App: आता घरबसल्या काही मिनिटांत करता येणार आधार अपडेट; सरकार लाँच करणार नवीन अ‍ॅप

e-Aadhaar Update Mobile App: आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही घरबसल्या आधार कार्ड अपडेट करु शकतात. यासाठी नवीन अॅप लाँच केले जाणार आहे.
Aadhaar Verification
Aadhaar VerificationSaam Tv
Published On
Summary

आधार अपडेट करणे होणार आणखी सोपे

नवीन अॅप होणार लाँच

घरबसल्या करता येणार आधारसंबंधित सर्व कामे

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड अपडेट करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला आधार कार्डमधील काही माहिती बदलायची असेल तर ते अपडेट करावे लागेल. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तुमचा पत्तादेखील बदलू शकतात. काही कामे तुम्ही ऑनलाइन करु शकतात. काही कामांसाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावे लागेल. मात्र, आता ही सर्व कामे सोपी होणार आहेत. तुम्ही घरबसल्या आधार अपडेट करु शकणार आहात.

Aadhaar Verification
Aadhaar-Pan Card Update: आधार-पॅनमध्ये नाव, जन्मतारीख वेगवेगळी; कामं रखडतील, घरबसल्या करा दुरुस्त, सोप्या टिप्स

सरकार आता आधार युजर्ससाठी मोबाईल अॅप तयार करत आहेत. तुम्ही -e-Aadhaar अॅपवरुन सर्वकाही अपडेट करु शकतात. हा अॅप डेव्हलप करण्याची जबाबादरी UIDAI कडे आहे. हा आधार अॅप डाउनलोड झाला की अनेक कामे सोपी होणार आहेत.

e-Aadhaar काय आहे ?

आधार अॅपवरुन तुम्ही घरबसल्या अनेक कामे करु शकतात. तुम्ही घरबसल्या आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख, फोन नंबर ही माहिती बदलू शकतात.यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने आधार सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही.तुम्हाला एआय आणि फेस आयडी टेक्नोलॉजीचा वापर करुन आधार कार्ड अपडेट करता येणार आहे.

बायोमॅट्रिक अपडेट प्रोसेस

आधार कार्डधारकांना बायोमॅट्रिक प्रोसेस करण्यासाठी आधार सेंटरमध्ये जावे लागेल. यूआयडीएआय अपडेट प्रोसेस अधिक सोपी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे तुमचे काम कमी होणार आहे. यामुळे पुढे कधीही अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Aadhaar Verification
Aadhaar-Pan Card Update: आधार-पॅनमध्ये नाव, जन्मतारीख वेगवेगळी; कामं रखडतील, घरबसल्या करा दुरुस्त, सोप्या टिप्स

कधी लाँच होणार अॅप

आधार कार्डचे हे नवीन अॅप अजूनपर्यंत पूर्णपणे तयार नाही आहे. मिडिया रिपोर्टनुसार, या वर्षी अखेरपर्यंत आधार अॅप लाँच करण्याची सरकारची तयारी आहे. या अॅपमध्ये फ्रेंडली डिजिटल इंटरफेस असणार आहे. यामुळे ग्राहकांचे काम खूप सोपे होणार आहेत.

Aadhaar Verification
Aadhaar Card: सुप्रीम कोर्टाचा नागरिकांना 'आधार'; नागरिकत्वासाठी आधार कार्ड ग्राह्य धरा, निवडणूक आयोगाला आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com