Aadhar Card Update : आधार कार्डाबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता अपडेटसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत

Aadhar Card Update latest : आधार कार्डाबाबत सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. आता लहान मुलांच्या बायमेट्रिक अपडेटसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत.
Aadhar card
Aadhar card New Rules Saam tv
Published On
Summary

५ ते ७ आणि १५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी आधार अपडेटचं शुल्क माफ.

आता ५० रुपये शुल्क लागू होणार नाहीत.

आधार बायोमेट्रिक अपडेटसाठी फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचे स्कॅन आवश्यक असणार

देशातील लाखो पालकांना दिलासा मिळणार

केंद्र सरकारने आधार कार्डाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता लहान मुले आणि अल्पवयीन मुलांची नवीन नोंदणी आणि बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही. या आधी सुविधेसाठी ५० रुपये शुल्क आकारले जात होते.

नव्या नियमानुसार, ५ ते ७ आणि १५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी आधार कार्डाच्या अपडेटचे शुल्क माफ असतील. या निर्णयाचा लाखोंना फायदा होणार आहे. केंद्र सरकारने लहान मुलांनाही आधार कार्डाचं बायोमेट्रिक अपडेट करणे सक्तीचे केलं होतं.

Aadhar card
Election Commission : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील ४४ पक्षांचा समावेश

तुम्ही जवळच्या आधार कार्ड केंद्रात डाऊन कार्डाचं अपडेट करू शकता. यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन एमआधार मोबाइल अॅप्लिकेशनचा उपयोग करून शोधू शकता. आधार कार्ड केंद्रावरून फॉर्म घेऊन भरून जमा करू शकता. तसेच बायोमेट्रिक डेटा जमा करू शकता. यासाठी फिंगरप्रिंट स्कॅन, डोळे स्कॅन करणे या दोन्ही प्रक्रिया कराव्या लागतील.

Aadhar card
Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयाची हॅट्रिक, रोमांचक सामन्यात ओमानला चारली धूळ

सरकारने लहान मुलांसाठी आधार कार्डात बायोमेट्रिक अपडेट करणे बंधनकारक केलं आहे. त्यामुळे लहान मुलांचही आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट करणे गरजेचे असणार आहे. यासाठी यूनिक आयडेंटिपिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यूआयडीएआयने गाइडलाइन जारी केली होती.

Q

सरकारने आधार कार्डबाबत कोणता नवा निर्णय काय?

A

केंद्र सरकारच्या नियमानुसार ५-७ आणि १५-१७ वयोगटातील मुलांसाठी आधार बायोमेट्रिक अपडेटचे शुल्क माफ करावे लागतील.

Q

बायोमेट्रिक अपडेटसाठी किती शुल्क घेतले जायचे?

A

आधी ५० रुपये शुल्क आकारले जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com