Baal Aadhaar Card Saam Tv
बिझनेस

Baal Aadhaar Card: नवजात बालकांचं आधार कार्ड कसं काढायचं? ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रोसेस वाचा

Baal Aadhaar Card Online and Offline Process: लहान मुलांचे आधार कार्ड हे वेगळे असते. ५ वर्षांखालील मुलांच्या आधार कार्डला बाल आधार कार्ड म्हणतात. हे आधार कसं काढायचं ते जाणून घ्या.

Siddhi Hande

नवजात बाळांचे आधार कार्ड कसं काढायचं?

बाल आधार कार्ड म्हणजे काय?

बाल आधार कार्ड काढण्याची ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत

आधार कार्ड हे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. बँक खाते उघडण्यापासून ते सरकारी कामांसाठी आधार कार्ड गरजेचे आहे. प्रत्येकाच्या आधार कार्डवर एक १२ अंकी युनिक नंबर असतो. हा नंबर UIDAI म्हणजेच युनिका आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया जारी करते. दरम्यान, नवजात बाळांचे आधार कार्ड कसं काढायचं हे तुम्हाला माहितीये का?

बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या जन्माचा दाखला, आधार कार्ड या सर्व गोष्टी काढणे गरजेचे असते. तुम्हाला जर बाळाला घेऊन फिरायला जायचे असेल तर पासपोर्ट काढावा लागतो, यासाठीही आधार कार्ड गरजेचे आहे. त्यामुळे नवजात बालकांचे बाल आधार कार्ड काढले जाते.

पाच वर्षांपेक्षा लहान मुलांचे बाल आधार कार्ड तयार केले जाते. यामध्ये बाळाचे नाव, फोटो, जन्मतारीख, लिंग याबाबत माहिती असते. या आधार कार्डशी आई वडिलांचे आधार नंबर लिंक असतात. हे आधार कार्ड काढण्यासाठी फिंगरप्रिंट बायोमेट्रिक किंवा आइरिस स्कॅनची गरज नाही.

बाल आधार कार्ड आहे तरी काय? (What is Baal Aadhaar Card)

५ वर्षांखालील मुलांचे जे आधार कार्ड काढले जाते त्याला बाल आधार कार्ड म्हणतात. यामध्ये बाळाची सर्व माहिती असते. हेच आधार कार्ड पुढे भविष्यात अपडेट करावे लागते.

आधार कार्ड कसं काढायचं?

बाल आधार कार्ड तुम्ही दोन पद्धतीने काढू शकतात. आधार सेवा केंद्रात तुमच्या बाळाचे आधार कार्ड काढून दिले जाते. अनेक सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येही जन्म प्रमाणपत्रासोबत आधार कार्ड बनवले जाते.

ऑनलाइन प्रोसेस

सर्वात आधी तुम्हाला UIDAI वेबसाइटवर जायचे आहे.

यामध्ये My Aadhaar वर क्लिक करा. यानंतर बुक अपॉइंटमेंटवर क्लिक करा.

यानंतर तुमचे शहर आणि मोबाईल नंबर निवडा. यानंतर ओटीपी टाकून वेरिफाय करा.

यानंतर आधार सेवा केंद्रात जाण्याची तारीख आणि वेळ निवडा.

ऑफलाइन प्रोसेस

तुम्हाला दिलेल्या वेळेनुसार तुम्हाला जवळच्या आधार कार्ड सेंटरमध्ये जायचे आहे.

यानंतर फॉर्म भरायचा आहे.

आईवडिलांची बायोमेट्रिक आणि आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला एक acknowledgment स्लिप मिळणार आहे.

हा एनरोलमेंट आयडी असणार आहे, तो तुम्ही जपून ठेवा.

यानंतर ६० ते ९० दिवसांत तुमच्या घरी आधार कार्ड डिलीवर केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

Indurikar Maharaj Daughter Royal Engagement: मुलीचं शाही लग्न, बोला इंदुरीकर काय करायचं?

Free Bike For Aadhaar Card Holders: आधारकार्ड असलेल्यांना मिळणार फ्री बाईक? केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT