ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टॅक्स फसवणूक रोखण्यासाठी सरकारने पॅन कार्ड आणि आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे.
हे लिंकिंग केवळ टॅक्स भरण्यासाठीच नाही तर बँकिंग आणि इतर कारणांसाठी देखील आवश्यक आहे.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, काही मिनिटांत पॅन आणि आधार लिंक्ड आहे की नाही हे कसे चेक करायचे, जाणून घ्या.
सर्वप्रथम लिंक तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट टॅक्स ई-फायलिंगला भेट द्या.वेबसाइटच्या होमपेजवरील "लिंक आधार स्टेटस" पर्यायावर क्लिक करा.
दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा १० अंकी पॅन क्रमांक आणि १२-अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा. तसेच, सुरक्षिततेसाठी दिलेला कॅप्चा योग्यरित्या भरा.
यानंतर, लिंक स्टेटस स्क्रीनवर दिसेल. लिंक्ड असल्यास Your Pan Is linked With Aadhaar म्हणजेच "तुमचा पॅन आधारशी लिंक आहे" असा मेसेज दिसेल.
जर लिंक नसेल तर Your Pan is Not Linked With Aadhaar म्हणजेच तुमचा पॅन आधारशी लिंक केलेला नाही असा मेसेज दिसेल. तुम्ही "लिंक आधार" वर क्लिक करून लिंकिंग प्रक्रिया सुरू करू शकता.