Ayushman Bharat Yojana Saam Tv
बिझनेस

Ayushman Bharat: ५६ कोटी नागरिकांना मिळतायत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; आयुष्मान कार्ड नक्की आहे तरी काय? कसं बनवायचं?

Ayushman Bharat Scheme: आयुष्मान भारत योजनेत नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात.या योजनेत तुम्ही कॅशलेस व्यव्हार करु शकतात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महिलांसाठी मुलींसाठी अनेक योजना आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठीही केंद्र सरकारने खास योजना राबवली आहे. केंद्र सरकारने नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना राबवल आहे. या योजनेत तुम्हाला ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. (Ayushman Bharat)

सध्या कधी कोणाला काय होऊ शकतं हे सांगता येत नाही. वैद्यकीय उपचार खूप महाग झाले आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबातील नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे. सध्या कोट्यवधी लोक या योजनेचा फायदा घेत आहेत. या योजनेत नागरिकांना ५ लाखांचे कव्हरेज मिळते.

आयुष्मान भारत

आयुष्मान भारत हे ओळखपत्र आहे. आयुष्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे कार्ड दिले जाते. प्रायव्हेट इन्श्युरन्स घेत असाल तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आयुष्मान कार्ड दाखवून तुम्ही कॅशलेस उपचार घेऊ शकतात.

आयुष्मान कार्ड कसं बनवायचं? (Ayushman Card)

आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला https://abdm.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.

त्यानंतर या योजनेचा लाभ ज्या व्यक्तीला घ्यायचा आहे त्याची सर्व कागदपत्रे वेरिफाय करायची आहे.

यानंतर तुम्हाला कुटुंबाचे सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. तुमची सर्व माहिती भरावी लागणार आहे. हे कार्ड तुम्ही प्रिंट करु शकतात.

या योजनेअंतर्गत तुमच्या जिल्ह्यातील काही ठरावीक रुग्णालयात जाऊन तुम्ही उपचार घेऊ शकतात.

यासाठी तुम्हाला www.pmjay.gov.in या वेबसाइटवर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर Empanelment Type या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा.

यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील हॉस्पिटलची यादी दिसेल. तुम्ही कॅशलेस व्यव्हार करुन लाभ घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

Indurikar Maharaj Daughter Royal Engagement: मुलीचं शाही लग्न, बोला इंदुरीकर काय करायचं?

SCROLL FOR NEXT