लगीन कसं करायचं? लगीन कुठल्या वयात करायचं? लगीन कुठल्या दिवशी करायचं? लग्नाला पावूनी रावळी बोलवायची किती ? सगळी माहिती स्टार्ट टू बॉटम इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनात देत्याती तीबी नाचून बघा की
हीत्त तर खरी गोम हाय.. महाराज कीर्तनात झ्याल झ्याल बोलून टाळ्या अन् शिट्ट्या मिळवत्यात.. समोर बसलेलं पब्लिक हासून पागलं पण महाराज स्वतः काय करत्यात बघा की, (मुलीच्या राजेशाही थाटातल्या लग्नाचे व्हिज्युअल लावा)..
साध्या पद्धतीने लगीन केल्यावर सुधा पोरं होत्याती म्हणणाऱ्या महाराजांच्या पोरीच्या साखरपुड्याचा ही हाय राजेशाही थाट.
संगमनेरच्या वसंत लॉनवर ही झाला साखरपुडा... २०-३० फुलांनी सजवलेल्या ब्रांडेड गाड्याचा भुंगाफाईट ताफा.... नव्या वधूवरासाठी रथ... पाहुण्यांची संख्या २५०० हजार... जेवणाचं ताट अंदाजे २०० रुपयचं. राजकीय नेत्यांची एंट्री अन् त्यांचा मानपान...महिलांकडून लिझीम तर वारकऱ्यांकडून कीर्तन करत स्वागत... अंगठी घालताना तर धुराचा इफेक्ट.. निस्ता पैशांचा पाऊस.... जणू काही एखाद्या उद्योगपतीचे लगीनच . पण त्यांच्या या उधळपट्टीवर सडकून टीका होती
असो इंदुरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि होणार जावई साहिल चिलाप यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा तर आहेतच पण इंदुरीकर महाराजांसाठी एकच लोकाला सांगायचं ब्रह्मण्यान आणि आपण कोरडे पाषाण. बाकी लग्नाचा इशष ज्याचा त्याचा... कुणी दणक्यात नाय तर कुणी साध्यात करा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.