EPF Account saam tv
बिझनेस

EPF Account: EPF खात्यातील या चुका वेळीच टाळा, अन्यथा दर महिन्याचे फंड कमी होतील

EPF Mistakes: EPF खाते व्यवस्थापनातील सामान्य चुका टाळा. नॉमिनी अपडेट, UAN सक्रियता, KYC माहिती आणि पासबुक तपासणीसारख्या छोट्या चुका तुमच्या मासिक फंडावर परिणाम करू शकतात. सुरक्षित आर्थिक भविष्य सुनिश्चित करा.

Sakshi Sunil Jadhav

रिटायरमेंटची सोय करताना EPF म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी एक भक्कम आर्थिक सुरक्षा देतो. हा फंड फक्त तुमच्या बचतीसाठी नाही तर भविष्यातील आर्थिक आधारासाठीही महत्वाचा असतो. मात्र काही छोट्या-मोठ्या चुका तुमच्या EPF खात्याच्या वाढीवर थेट परिणाम करू शकतात आणि महिन्यातून तुमचा फंड अपेक्षेपेक्षा कमी जमा होऊ शकतो.

अनेक लोक EPF खाते सुरू करताना किंवा नोकरी बदलताना नॉमिनी अपडेट करणं विसरतात. ही चूक केवळ तुमच्या कुटुंबासाठी भविष्यात अडचणी निर्माण करू शकतात. तर काही वेळा क्लेम प्रक्रियेला ही लांबवू शकते. समजा खाते धारकाचा मृत्यू झाला असेल आणि त्याला नॉमिनी नसल्यास कुटुंबाला पैसे मिळविण्यात अडचणी येतात. म्हणून EPF खात्यात लॉग इन करून नॉमिनी तपासणे आणि अपडेट करणे गरजेचे आहे.

नोकरी बदलताना काही लोक जुने EPF खाते नवीन खात्यात ट्रान्सफर करायला विसरतात. त्यामुळे त्यांच्याकडे एकाहून जास्त खाते राहतात. यावर वेगवेगळ्या रक्कमांवर व्याज काढले जाते आणि बंद असलेल्या खात्यांवर ठराविक वेळेनंतर व्याज मिळणे थांबते. त्यामुळे मोठा आर्थिक तोटा होऊ शकतो. EPFOच्या वेबसाइटवर हे खाते एकत्र करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे जुने खाते नवीन खात्यात ट्रान्सफर केले पाहिजे.

UAN युनिव्हर्सल अकाउंट नंबर अॅक्टिवेट न करणे ही एक मोठी चूक आहे. UAN हे EPF संबंधित ऑनलाइन सुविधांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. नॉन-अॅक्टिवेट केलेले UAN तुम्हाला ऑनलाइन फंड तपासणी, ट्रान्सफर किंवा विड्रॉलसाठी प्रतिबंध करते. त्यामुळे जस मिळतं. पुढे UAN मिळाल्यावर लगेच EPFO पोर्टलवर अॅक्टिवेट करा. तुमच्या खात्याशी योग्य बँक डिटेल आणि पूर्ण KYC माहिती लिंक न करणे देखील नुकसानकारक ठरते. चुकीचे बँक खाते, IFSC किंवा अपूर्ण KYC असल्यास फंड काढणे अडचणीत येते. खात्री करा की सर्व बँक व KYC माहिती अपडेटेड आणि सत्यापित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Court Fine: प्रसिद्ध अभिनेत्रीला मोठा झटका, ग्राहक आयोगाने ठोठावला ४.२५ लाखांचा दंड; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: संत मुक्ताईंच्या पालखीचा मार्ग खडतर

Monsoon Health: पावसाळ्याच्या दिवसात सकाळी उठल्यावर ही 3 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

नव्या नवरीसाठी १ ग्रॅम मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स; गळ्यात दिसतील उठून

Beed Crime: बीड हादरले! ऊसतोड मजुराचे अपरहण, ४ दिवस डांबून ठेवत रक्त येईपर्यंत मारहाण; तोंडात लघुशंका केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT