Credit Score Mistake Saam Tv
बिझनेस

Credit Card Score Mistake : क्रेडिट कार्ड वापरताय? या चुका करु नका, येऊ शकते आर्थिक संकट

Credit Card Problem : हल्ली कोणत्याही बँक सहज व सोप्या पद्घतीने आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड ऑफर करतात.

कोमल दामुद्रे

Common Credit Card Mistake : तरुणाईमध्ये क्रेडिट कार्डचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. हल्ली कोणत्याही बँक सहज व सोप्या पद्घतीने आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड ऑफर करतात. क्रेडिट कार्डचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे देखील.

आपल्या आर्थिक अडचणीत क्रेडिट कार्ड उपयोगी पडते, पण अनेक वेळा ते वापरताना आपण अशा चुका करतो की, कर्जाचा बोझा वाढतो. जर तुम्ही नुकतेच क्रेडिट कार्ड विकत घेतले असेल तर ते वापरण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊया त्याबद्दल

1. क्रेडिट कार्डची पूर्ण मर्यादा संपवू नका

बरेच लोक क्रेडिट कार्डची (Credit) संपूर्ण मर्यादा संपवतात. असे कधीही करु नका. क्रेडिट कार्डमध्ये दिलेली मर्यादा आपत्कालीन परिस्थितीत वापरायला हवी. जर तुम्ही दर महिन्याला क्रेडिट कार्डची मर्यादा संपवत असाल तर तुम्हाला ती रक्कम (Money) भरावी लागेल. याशिवाय क्रेडिट कार्डची मर्यादा पूर्ण खर्च केल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो.

2. वेळेवर बिले भरा

जेव्हा तुमच्याकडे क्रेडिट कार्डचे बिल असेल तेव्हा तुम्ही ते वेळेवर भरावे. तुम्ही बिल उशिरा भरल्यास, तुम्हाला अधिक चार्जेस देखील भरावे लागू शकते. बिल पेमेंट करताना, प्रथम क्रेडिट कार्ड मर्यादा भरावी लागेल. यानंतर तुम्हाला किमान शिल्लक रक्कम भरावी लागेल. जर तुम्ही किमान शिल्लक रक्कम भरली आणि मर्यादा उशिरा भरली तर तुम्हाला जास्त व्याजदर भरावा लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबून जाऊ शकता.

3. क्रेडिट कार्डसह आंतरराष्ट्रीय व्यवहार

आंतरराष्ट्रीय व्यवहार कधीही क्रेडिट कार्डने करू नयेत. असे केल्यास, परकीय चलन व्यवहार शुल्क भरावे लागेल. यासाठी आपल्याला अधिक पैसे मोजावे लागतात. अशावेळी तुम्ही क्रेडिट कार्डऐवजी प्रीपेड कार्ड वापरावे. याशिवाय तुम्ही फॉरेक्स कार्ड देखील वापरू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजकारणात नव्या समीकरणांची नांदी? एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येणार?

Raj Thackeray: 'ही लाडकी बहीण योजना? महाराष्ट्रातही युपी बिहारमधील प्रकार सुरू; मुली नाचवण्यावरून राज ठाकरे संतापले

Satej Patil : काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना अश्रू अनावर; कार्यकर्त्याशी बोलताना हुंदका भरला, VIDEO

Manoj Jarange News : विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगेंची माघार, कुणाचा होणार मोठा फायदा? VIDEO

Maharashtra News Live Updates: मोठी बातमी! महाराष्ट्र मध्यप्रदेश बॉर्डरवर पोलीसांना कारमध्ये 70 लाखांची रोकड

SCROLL FOR NEXT