Gold Silver Price (14th August): सोन्याचा दर जैसे थे! चांदीही चकाकली, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा भाव

Today's 14th August Gold Silver Rate In Maharashtra : ऑगस्ट महिन्यात सोन्या-चांदीचे दर घसरले आहे. त्यामुळे सतत भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे.
Gold Silver Price
Gold Silver PriceSaam tv
Published On

Gold Silver Rate In Maharashtra (14th August):

आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकीची अनेक साधने उपलब्ध असताना भारतीय बाजारात सोन्याच्या गुंतवणूकीला अधिक प्राधान्य देतात. जुलै महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात वाढ होती परंतु, ऑगस्ट महिन्यात सोन्या-चांदीचे दर घसरले आहे. त्यामुळे सतत भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे.

मागच्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात ४००० रुपयांनी घसरण झाली होती. येत्या आठवड्यात सोन्या-चांदीचा भाव किती असेल हे पाहावा लागेल. जाणून घेऊया आजचा सोने-चांदीचा भाव

Gold Silver Price
Gold Silver Price (12th August): गोल्डन चान्स! सलग पाचव्या दिवशी घसरला सोन्या-चांदीचा भाव, जाणून घ्या आजचा दर

1. आजचा सोन्याचा भाव

बुलियन मार्केटच्या वेबसाईटनुसार, आज १४ ऑगस्टला १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५८,८८० आहे तर मागच्या आठवड्याच याची किंमत ५८,८८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती.

2. चांदीचा भाव

बुलियन मार्केटच्या वेबसाइटनुसार, चांदी ६९,९३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७०,११० रुपये प्रतिकिलो होती.

Gold Silver Price
Best Place In Konkan : निसर्ग सौंदर्याने बहरला कोकण, पावसाळ्यात ही १० ठिकाणं प्रेमात पाडतीलच!

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याची किंमत ५३,९७३ प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट  सोन्याचा (Gold) दर ५३,९७३ रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५३,९७३रुपये इतका असेल. हा दर मागच्या आठवड्यातही इतकाच होता.

Gold Silver Price
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2023: येत्या आठवड्यात २ मोठ्या ग्रहांचे संक्रमण! मिळेल बक्कळ पैसा, नशीबाची साथ

4.  हॉलमार्कचे (Hallmark)  सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com