कोमल दामुद्रे
मेष राशीचे लोक या आठवड्यात कुटुंबासोबत जास्त वेळ घालवतील. बाहेर जाण्याचा प्लान कराल. गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा तणावाचा असू शकतो. तुमच्या वैवाहिक जीवनात चढ-उतार येऊ शकतात.
मिथुन राशीचे लोक या आठवड्यात आपल्या प्रेयसीसोबत वेळ घालवतील. कौटुंबिक वेळेचा आनंद घ्याल. यावेळी तुम्ही ऑफिसच्या कामातून मोकळे व्हाल.
कर्क राशीचे लोक विवाहाच्या बंधनात बांधले जाऊ शकतात. जर तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे.
सिंह राशीचे लोक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
कन्या राशीचे लोक कुटुंबातील सदस्यांशी वाद घालू शकतात. त्यामुळे घरात तणावाचे वातावरण राहील.
तूळ राशीचे लोक या आठवड्यात कामात व्यस्त राहतील. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात वाढ होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात नवीन मित्र भेटू शकतात. यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुम्हाला तणावमुक्त वाटेल.
धनु राशीच्या लोकांनी या आठवड्यात वेळेचा सदुपयोग करावा. तुम्ही कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन आला आहे.
या आठवड्यात मकर आर्थिक बाबतीत थोडे चिंतेत राहतील. त्यांना एकतर पैशाची गरज असेल किंवा ते त्यांचे पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करतील.
कुंभ राशीचे लोक कौटुंबिक जबाबदाऱ्यांबद्दल चिंतित आणि तणावग्रस्त राहतील.
मीन राशींच्या नात्यात दूरावा येईल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात मतभेद होतील.