August Weekend 2025 Saam Tv
बिझनेस

August Weekend 2025: आताच लाँग वीकेंडचा प्लॅन करा, एका आठवड्यात सलग चार सुट्ट्या, वाचा सविस्तर

August Month Long Weekend: ऑगस्ट महिन्यात सलग दोन आठवड्यांमध्ये तुम्हाला सुट्ट्या आहेत. पुढच्या आठवड्यात लागोपाठ ३ दिवस सुट्ट्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये तुम्ही छोटीशी ट्रीप प्लान करु शकतात.

Siddhi Hande

ऑगस्टमध्ये सलग दोन आठवड्यात वीकेंड

पुढच्या आठवड्यात सलग तीन दिवस सुट्ट्या

या ठिकाणी फिरायला जा

नोकरदारवर्गासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ऑगस्ट महिन्यात अनेक सणासुदीचे दिवस सुरु आहे. सणासुदीच्या दिवसात अनेक सुट्ट्या मिळतात. अशातच ऑगस्ट महिन्यात तुम्हाला लाँग वीकेंड मिळणार आहे. दोनदा तुम्हाला वीकेंडच्या सुट्ट्या मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा प्लान करु शकतात. (August Month Weekend List)

तुम्हाला या आठवड्यात ९ आणि १० ऑगस्ट रोजी सुट्टी असणार आहे. ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे आणि १० तारखेला रविवार असल्याने सुट्टी असणार आहे.

दरम्यान, पुढच्या आठवाड्यात तुम्हाला तीन दिवस लागोपाठ सुट्ट्या मिळणार आहे. १५ ऑगस्ट शुक्रवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त सुट्टी मिळणार आहे. त्यानंतर १६ ऑगस्टला गोपाळकाळा, दहीहंडी आहे. या दिवशीही तुम्हाला सुट्टी असणार आहे. त्यानंतर १८ ऑगस्टला रविवार आहे. सलग तीन दिवस तुम्हाला सुट्ट्या असणार आहे. या सुट्ट्यांच्या आधी एक दिवस किंवा नंतर एक दिवस सुट्टी घेतली तर लागोपाठ ४ दिवस सुट्ट्या मिळणार आहे. या दिवसात तु्म्ही फिरण्याचा चांगला प्लान करु शकतात.

या ठिकाणी करा ट्रीप प्लान (Weekend Trip Plan)

गावी जा

गावी जाण्यासाठी कोणत्याही मूहूर्ताची गरज नसते. आता लागोपाठ ४ दिवसांच्या सुट्ट्या आहे तर तुम्ही तुमच्या गावी भेट द्या. गावी जाऊन मस्त रिफ्रेश व्हाल.

गोवा ट्रीप

गोव्याची ट्रीप तुम्ही प्लान करु शकतात. चार दिवसांसाठी तुम्ही गोव्याला जाऊन मज्जा करा. याचसोबत रोड ट्रीप जर केली तर तुम्हाला अजूनच मज्जा येईल.

हम्पी

तुम्ही हम्पीला भेट देऊ शकतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेजवळील या ठिकाणी तुम्हाला फिरण्यासाठी अनेक जागा आहेत. तुम्ही येथे रोड ट्रीप किंवा ट्रेननेदेखील जावू शकतात.

कोकण

मस्त पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात कोकण फिरण्याची मज्जा काही वेगळीच असते. तुम्ही मस्त निसर्गरम्य वातावरणात जाऊन मज्जा करु शकतात. बीचवर फिरु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचा नवीन फीचर! नॉन-व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सशीही चॅट करणं शक्य

Two Wheelers: होंडा की हिरो? जुलै २०२५ मध्ये कोणत्या कंपनीने अधिक विक्री केली?

Kabutarkhana Row: कबुतरखाना अचानक बंद नकोच; पर्यायी उपाययोजना करा – मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश|VIDEO

Maharashtra Live News Update : छत्रपती संभाजीनगर म्हाडातर्फे सदनिकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Stomach Cancer: पोटाच्या कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात कोणते मोठे बदल दिसतात?

SCROLL FOR NEXT