पैसे कापले गेले तरीही काहीवेळेस कॅश मिळत नाही.
आरबीआयने अशा व्यवहारांसाठी स्पष्ट नियम बनवले आहेत
५ कार्यदिवसांत पैसे परत मिळणे बंधनकारक
जर एटीएममधून पैसे काढताना खात्यातून रक्कम कापली गेली पण मशीनमधून पैसे बाहेर आले नाहीत, अशी स्थिती अनेकांनी अनुभवली असेल. बऱ्याचवेळा पैसे कापल्या गेल्याचा अनुभव अनेकांना आला असेल. पण पैसे कसे येतात याबाबत अनेकांना माहिती नाहीये. याबाबत आरबीआयचे नियम काय आहेत. हे जाणून घेऊ. जर एटीएममधून पैसे काढताना पैसे कापल्या गेल्याचा मेसेज आला आणि कॅश मिळाली नाहीतर घाबरून जाऊन नका. योग्य वेळी तक्रार दाखल करून आणि स्थापित प्रक्रियांचे पालन करून, तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. पैसे कापल्यानंतर तुम्हाला एटीएममधून पैसे मिळाले नाहीत तर?
त्यानंतर तु्म्ही बँकेत तक्रार दाखल करा. तुम्ही हे बँकेच्या मोबाइल अॅप, नेट बँकिंग पोर्टलद्वारे किंवा कस्टमर केअर नंबरवर कॉल करून करू शकता. २४ ते ४८ तासांच्या आत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून समस्येचं निराकरण लवकर होईल.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) नियमांनुसार, जर एटीएममधून रोख रक्कम मिळाली नाही परंतु पैसे कापले गेले तर, व्यवहाराच्या तारखेपासून पाच कामकाजाच्या दिवसांच्या आत बँकेने तुमचे पैसे परत करणे आवश्यक आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, त्यापूर्वीच तुमच्या खात्यात पैसे जमा होत असतात.
जर बँक निर्धारित वेळेनंतर पैसे परत करत नसेल, तर तुम्ही आरबीआयच्या तक्रार व्यवस्थापन प्रणाली (सीएमएस) वर तक्रार दाखल करावी. यासाठी cms.rbi.org.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन तक्रार दाखल करता येते. बँकेने येथे प्रतिसाद देणे आवश्यक आहे.
जर बँकेने आरबीआयने दिलेल्या अंतिम मुदतीनंतर पैसे परत करण्यास उशीर केला तर तुम्हाला दररोज ₹१०० भरपाई दिली जाईल. संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात जमा होईपर्यंत ही रक्कम उपलब्ध असते. या प्रकारच्या एटीएम समस्येबद्दल घाबरून जाण्याची गरज नाही. योग्य माहिती आणि वेळेवर कारवाई केल्यास तुमचे पैसे परत मिळू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.