Atal Pension Yojana Saam Tv
बिझनेस

Atal Pension Yojana: या कर्मचाऱ्यांची पेन्शन ₹५००० वरुन १०,००० रुपये होणार; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Atal Pension Yojana Update: केंद्र सरकार अटल पेन्शन योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतो. अटल पेन्शन योजनेत किमान पेन्शन १०,००० रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

अटल पेन्शन योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

पेन्शन १०,००० रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता

सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना सुरु केली आहे. अटल पेन्शन योजनेत कामगारांना दर महिन्याला पेन्शन मिळते. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेत मदत मिळते. कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी, या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली आहे. आता योजनेत बेसिक पेन्शन वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार (Atal Pension Yojana Increase to 10,000 Rupees)

अटल पेन्शन योजनेत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पेन्शन मिळते. सध्या कर्मचाऱ्यांना ५००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळते.ही पेन्शन वाढवली जाऊ शकते. ही रक्कम दुप्पट म्हणजे १० हजार रुपये होई शकते.

मिडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे PFRDA यांच्यात चर्चा सुरु आहे. वाढती महागाई आणि म्हातारपणातील खर्च आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन पेन्शन कमी पडत असल्याचे सरकारचे मत आहे. त्यामुळे पेन्शनची कमाल मर्यादा ८००० ते १०,००० रुपयांपर्यंत होऊ शकते.

अटल पेन्शन योजनेत असंघटित क्षेत्रातील कामगारांना म्हातारपणात मदत केली जाते. यासाठी तुम्हाला ठरावीक रक्कम गुंतवायची असते. त्या आधारावर तुम्हाला १ ते ५ हजारांची पेन्शन दिली जाते. हीच पेन्शन १० हजारांपर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अटल पेन्शन योजनेत असंघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी म्हणजे ज्यांचे ईपीएफओ अकाउंट नाही अशा कामगारांना लाभ मिळतो. रस्त्यावरील विक्रेते, घरगुती कामगार, मजुर, बांधकाम कामगार या कर्मचाऱ्यांना लाभ मिळतो. या कर्मचाऱ्यांना भविष्यात पेन्शनसाठी काही पर्याय नसतो. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही आयुष्यभर पेन्शन मिळवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: NCERT च्या विरोधात साताऱ्यात एल्गार, छत्रपती घराण्याच्या वतीने काढण्यात आला मोर्चा

Liver Detox Drinks: फॅटी लिव्हर कंट्रोल करण्यासाठी हे डिटॉक्स वॉटर ठरेल फायदेशीर

Health Care: जेवणाआधी पाणी पिणे की जेवणानंतर? चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

Kalyan Dombivli : कल्याण- डोंबिवलीत पाणीबाणी, १२ तास पाणीपुरवठा राहणार बंद; कोणकोणत्या भागांना फटका बसणार?

Bharat Taxi: ओला उबरला देणार टक्कर! 'भारत टॅक्सी' सेवा मुंबईत सुरु; किती भाडे द्यावे लागणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT