Atal Pension Yojana Saam Tv
बिझनेस

Atal Pension Yojana: सरकारची सुपरहीट योजना! रोज फक्त ७ रुपये गुंतवा अन् महिन्याला ₹५००० पेन्शन मिळवा

Atal Pension Yojana : केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो. तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शनची गॅरंटी मिळते. या योजनेत तुम्ही फक्त ७ रुपयांपासून गुंतवणूकीला सुरुवात करु शकतात.

Siddhi Hande

सरकारची अटल पेन्शन योजना

महिन्याला मिळणार ५००० रुपयांची पेन्शन

दिवसाला फक्त ७ रुपये गुंतवा अन् पेन्शन मिळवा

नोकरदार वर्गाला नेहमी आपल्या भविष्याची काळजी असते. सध्या दर महिन्याला पगार येतो म्हणून महिन्याभराचा खर्च सहज भागवता येतो. परंतु भविष्यात सेवानिवृत्तीनंतर खर्च भागवण्यासाठी महिन्याला एक ठरावीक रक्कम मिळते गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला आतापासूनच गुंतवणूक करायची आहे. जेणेकरुन म्हातारपणात तुम्हाला आर्थिक मदत मिळेल. अशीच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना. या योजनेत जवळपास ८ कोटींपेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेत आहेत.

अटल पेन्शन योजनेत स्वतः सरकार गॅरंटी देते. त्यामुळे सुरक्षेची हमी असते. या योजनेत तुम्ही खूप कमी रुपयांची गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळवू शकतात. दररोज फक्त ७ रुपयांची गुंतवणूक करायची आहे.

अटल पेन्शन योजनेत तुम्हाला १००० रुपये ते ५००० रुपयांपर्यंतची पेन्शन मिळते. या योजनेत १८ ते ४० वयोगटातील नागरिक लाभ घेऊ शकतात. या योजनेत पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी २० वर्षे गुंतवणूक करायची आहे.

महिन्याला मिळणार ५००० रुपयांची पेन्शन

तुम्हाला २० वर्षे गुंतवणूक करायची आहे. त्यामुळे तुम्ही जर ४० व्या वर्षी गुंतवणूक केल तरी तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षापासून महिन्याला २१० म्हणजेच दिवसाला ७ रुपये गुंतवले तर तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. तुम्हाला ५००० रुपयांची पेन्शन मिळू शकते.

अटल पेन्शन योजनेत तुम्ही जेवढी गुंतवणूक करणार त्यावर तुम्हाला किती पेन्शन मिळणार हे ठरलेले असते. त्यामुळे तुम्हाला जर महिन्याला १००० रुपयांची पेन्शन हवी असेल तर महिन्याला ४२ रुपये गुंतवायचे आहेत.

अटल पेन्शन योजनेत पती-पत्नी दोघेही अकाउंट उघडू शकतात. या दोघांनाही १० हजार रुपयांपर्यंतची पेन्शन मिळते. जर पतीचे निधन झाले तर त्याची पेन्शन पत्नीला मिळते. नॉमिनीलादेखील ही रक्कम मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chaibasa News : ३६ तासांपासून धुमश्चक्री, जवान तुटून पडले, आतापर्यंत २१ नक्षलवाद्यांचा खात्मा

Kalyan : ६० हजारांचा मोह, तो बुकिंग क्लर्क अन् अलगद जाळ्यात अडकला रेल्वेचा तोतया व्हिजिलन्स इन्स्पेक्टर

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेवर वाद, दूरच्या केंद्रांमुळे उमेदवारांचे आंदोलन

Amazon Layoffs: मोठी बातमी! अ‍ॅमेझॉनमध्ये सर्वात मोठी नोकरकपात, १४,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार

IND vs PAK: पाकिस्तानी खेळाडूशी हँडशेक, मिठीही मारली...; सामन्यानंतर इरफान पठाण सोशल मीडियावर ट्रोल

SCROLL FOR NEXT