Atal Pension Yojana  Canva
बिझनेस

Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत दर महिन्याला मिळते ५००० रुपयांची पेन्शन; गुंतवणूकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

Atal Pension Yojana: केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना खूप लोकप्रिय आहे. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळू शकते. तुम्ही जेवढी गुंतवणूक कराल त्यानुसार तुम्हाला पेन्शन मिळणार आहे.

Siddhi Hande

अटल पेन्शन योजना

अटल पेन्शन योजनेत मिळणार महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन

सेवानिवृत्तीनंतर मिळणार दर महिन्याला पैसे

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील काही योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात आर्थिक मदत मिळते. अशीच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे.

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला महिन्याला ५००० रुपये पेन्शन मिळणार आहे. वर्षाला ६०,००० रुपये मिळणार आहे. मोदी सरकारची अटल पेन्शन ही सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत मिळते. ही योजना ९ मे २०१५ रोजी सुरु करण्यात आली होती.

वित्त मंत्रालयानुसार २०२४-२५ मध्ये आतापर्यंत ५६ लाख नवीन खातेधारकांना अटल पेन्शन योजनेत अकाउंट ओपन केले आहे. एकूण ७ कोटी नागिरक या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेत तुम्हाला कमीत कमी गुंतवणूक करुन जास्तीत जास्त परतावा मिळणार आहे.

अटल पेन्शन योजनेचे फायदे (Atal Pension Yojana Benefits)

अटल पेन्शन योजनेत लाभार्थ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर १०००, २०००,३०००,४००० किंवा ५००० रुपये पेन्शन मिळणार आहेत. या योजनेत पेन्शनची रक्कम तुमच्या योगदानावर अवलंबून असणार आहे. तुम्ही खूप कमी वयात गुंतवणूक सुरु केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे.

जर तुम्ही वयाच्या १८व्या वर्षी महिन्याला ४२ रुपये गुंतनले तर तुम्हाला ६० वर्षानंतर महिन्याला १००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे. जर तुम्ही ४० व्या वर्षी महिन्याला १,४५४ रुपये गुंतवले तर तुम्हाला ५००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला सुरक्षा मिळणार आहे.

अटल पेन्शन योजनेत १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. इन्कम टॅक्स भरणारे नागरिक या योजनेसाठी पात्र नाही.पेन्शनची रक्कम ही तुमच्या योगदानानुसार वेगवेगळी असणार आहे.

या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने बँकेत जाऊन अर्ज करायचा आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या पोर्टलवर जाऊनदेखील अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

Rapido Viral Video: रॅपिडोचालकाचं अश्लील कृत्य! बाईकवर बसलेल्या महिलेला केला स्पर्श; VIDEO शेअर करत म्हणाली...

Sunday Horoscope: या राशीच्या बॅंक बॅलेन्समध्ये वाढ होईल, वाचा रविवारचे खास राशीभविष्य

Navi Mumbai Tourism : नवी मुंबईतील 'हे' मनमोहक ठिकाण थंडीत बेस्ट वीकेंड डेस्टिनेशन

व्हीव्हीपॅट पावत्यांचा रस्त्याच्या कडेला ढीग; दोन अधिकारी निलंबित, आयोगाकडूनही स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT