Bullet Train Project  x
बिझनेस

Bullet Train: बुलेट ट्रेन लवकरच धावणार; मुंबई-अहमदबाद प्रवासाचे २ तास वाचणार, जाणून घ्या ट्रेनचा ताशी स्पीड अन् थांबे?

Mumbai Ahmedabad Bullet Train Project: देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Bharat Jadhav

  • भारतातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.

  • ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार असून, प्रवासाचा वेळ २ तास ७ मिनिटांनी कमी होणार आहे.

  • भावनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मोठी माहिती दिली.

  • रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक टप्पा मानला जातो.

आता मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा प्रवासाचा वेळ दोन तास सात मिनिटांनी कमी होणार आहे. त्याच कारण म्हणजे भारतातील पहिली बुलेट ट्रेन सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलीय.केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे भावनगर टर्मिनसवर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी अयोध्या एक्सप्रेस, रेवा-पुणे एक्सप्रेस आणि जबलपूर-रायपूर एक्सप्रेसला व्हर्च्युअल पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन बाबत मोठी अपडेट दिलीय.

"मुंबई ते अहमदाबाद दरम्यान पहिली बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. ही ट्रेन जेव्हा सुरू होईल, तेव्हा मुंबई ते अहमदाबादच्या प्रवासाला फक्त दोन तास सात मिनिटे लागतील," असे वैष्णव म्हणाले. भारतातील पहिली बुलेट ट्रेन ५०८ किलोमीटरपर्यंत धावेल.

ही रेल्वे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधून आपला प्रवास सुरू करेल. गुजरातमधील वापी, सुरत, आणंद, वडोदरा आणि अहमदाबादला ट्रेनचा अंतिम स्टॉप असणार आहे. ताशी ३२० किमी वेगाने धावत ही ट्रेन मुंबई-अहमदाबादचा प्रवास ३ तासात पूर्ण करेल. या दोन्ही शहरादरम्यान १२ स्टेशन असतील. मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती येथे १२ स्थानके बांधण्यात येतील. ३० जून २०२५ पर्यंत, या प्रकल्पावर एकूण ७८,८३९ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

येथे एका सभेला संबोधित करताना, केंद्रीय मंत्र्यांनी गुजरातमधील आगामी रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली, ज्यात पोरबंदर आणि राजकोट दरम्यान एक नवीन ट्रेन, राणावाव स्टेशनवर १३५ कोटी रुपयांची कोच देखभाल सुविधा, पोरबंदर शहरातील एक रेल्वे उड्डाणपूल, दोन गति शक्ती कार्गो टर्मिनल आणि भावनगरमधील नवीन बंदरात एक कंटेनर टर्मिनल यांचा समावेश आहे.

भारतात बुलेट ट्रेन कधी सुरू होणार आहे?

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, भारतातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार आहे.

बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहे?

बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे.

या बुलेट ट्रेनमुळे किती वेळ वाचणार आहे?

प्रवासाचा वेळ दोन तास सात मिनिटांनी कमी होणार आहे.

अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती कुठे दिली?

भावनगर टर्मिनस येथे पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

ST आरक्षणासाठी धनगर पुन्हा आक्रमक; आंदोलनानंतर धनगर समाजाचं आमरण उपोषण, VIDEO

SCROLL FOR NEXT