Honda Electric Bike: होंडाची इलेक्ट्रिक बाईक 'या' दिवशी लाँच होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स

Honda EV Features: होंडा २ सप्टेंबरला नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच करणार आहे. कंपनीने टीझर व्हिडिओ जारी केला असून, बाईकची डिझाइन EV Fun Concept सारखी असण्याची शक्यता आहे.
Honda’s upcoming electric bike features
Honda’s upcoming electric bike features
Published On
Summary
  • होंडाची नवीन इलेक्ट्रिक बाइक २ सप्टेंबर २०२५ रोजी लाँच होणार आहे.

  • बाइकमध्ये डिजिटल TFT डिस्प्ले आणि CCS2 जलद चार्जिंग सुविधा असतील.

  • ही बाईक EV Fun Concept वर आधारित असून, ५० बीएचपी पॉवर जनरेट करेल.

  • भारतात याचे लाँचिंग अद्याप निश्चित झालेले नाही, कंपनी सध्या ई-स्कूटर्सवर लक्ष केंद्रित करत आहे.

होंडा इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सवर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीने जगभरातील बाजारासाठी नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच करण्याची तयारी सुरू केली असून, अलीकडेच सोशल मीडियावर त्याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये होंडाने २ सप्टेंबर रोजी नवीन इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार असल्याची पुष्टी केली आहे, जरी बाईकची रचना अद्याप लपवण्यात आली आहे. तरीही, व्हिडिओमध्ये बाईक चालवताना दाखवण्यात आली असून, तिची डिझाइन EV फन कॉन्सेप्टसारखी असण्याची शक्यता आहे.होंडाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये EICMA मिलान मोटरसायकल शोमध्ये EV फन कॉन्सेप्ट सादर केला होता, आणि मीडिया अहवालांनुसार, नवीन बाईक ५० बीएचपी पॉवर जनरेट करेल.

Honda’s upcoming electric bike features
Car Safety Features: गाडीच्या मागच्या काचेवर लाल रेषा का असतात?

इलेक्ट्रिक बाईकची ही आहेत वैशिष्ट्ये

आगामी मोटरसायकलमध्ये मोठा डिजिटल TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट DRL, बार-एंड मिरर, क्लिप-ऑन हँडलबार आणि सिंगल-साइड स्विंग आर्म यासारखी आधुनिक वैशिष्ट्ये असतील. याशिवाय, होंडाने या बाईकमध्ये CCS2 चार्जिंग फीचर देण्याची पुष्टी केली आहे, ज्यामुळे जलद चार्जिंगची सोय उपलब्ध होईल.

Honda’s upcoming electric bike features
Car Care Tips: गाडीवर अनावश्यक खर्च नकोय? मग हे ५ स्मार्ट ट्रिक्स तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर

लाँचिंगची तारीख जवळ येत असल्याने, येत्या काही आठवड्यांत या नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकलबाबत अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी, होंडाने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल E-VO लाँच केली आहे, जी ४.१ kWh आणि ६.३ kWh बॅटरी पॅकमध्ये उपलब्ध असून, एका चार्जवर अनुक्रमे १२० किमी आणि १७० किमीची रेंज देते. सध्या कंपनी भारतासाठी या नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकलबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही, आणि भारतीय बाजारात ती लवकर येण्याची शक्यता कमी आहे कारण कंपनी सध्या ई-स्कूटर्सवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.

Q

होंडाची इलेक्ट्रिक बाइक कधी लाँच होणार आहे?

A

होंडाची इलेक्ट्रिक बाइक २ सप्टेंबर २०२५ रोजी लाँच होणार आहे.

Q

या इलेक्ट्रिक बाईकची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत?

A

यामध्ये डिजिटल TFT डिस्प्ले, CCS2 जलद चार्जिंग, सिंगल-साइड स्विंग आर्म, आणि ५० बीएचपी पॉवर आहे.

Q

ही बाईक कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे?

A

ही बाईक होंडाच्या EV Fun Concept वर आधारित असून, त्यातील अनेक तंत्रज्ञान वापरले गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com