Apple Airpods 4  Saam Tv
बिझनेस

Apple Airpods 4 लॉन्च! गाणी ऐकण्याचा आनंद होणार दुप्पट, मिळणार दमदार साउंड क्वालिटी; किंमत किती?

Apple Airpods 4 Launch: Apple ने आपले नवीन Apple Airpods 4 लॉन्च केले आहे. याचीच किंमत आणि फीचर्स जाणून घेऊ...

Satish Kengar

Apple ने आपले न्यू जनरेशन AirPods लॉन्च केले आहेत. या नवीन Airpods मध्ये तुमचा गाणी ऐकण्याचा आनंद दुप्पट होणार आहे, कारण यात जबरदस्त साउंड क्वालिटी ग्राहकांना मिळणार आहे. नवीन लॉन्च झालेल्या Apple Airpods मध्ये ग्राहकांना काय मिळणार आहे खास, याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Apple Airpods 4 फीचर्स

Apple ने AirPods 4 चे दोन मॉडेल लॉन्च केले आहेत. जे H2 चिपसह सुसज्ज आहे. हे न्यू जनरेशन AirPods चांगला बास आणि क्लिअर साउंड आणि जबरदस्त ऑडिओ क्वालिटीसह येतात.

AirPods 4 मध्ये अडॅप्टिव्ह ऑडिओ, हँड्स-फ्री कॉलिंग आणि जेश्चर-बेस्ड सिरी इंटरॅक्शनसह क्लिअर कॉलिंगसाठी व्हॉइस आयसोलेशनची सुविधा मिळते. नवीन AirPods 4 चार्जिंग केस कॉम्पॅक्ट आहे, जो USB-C ला सपोर्ट करतो. याची बॅटरी लाईफ एकूण 30 तासांची आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

Apple ने AirPods 4 चे दुसरे मॉडेल देखील सादर केले आहे. ज्यात अ‍ॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन, चांगला मायक्रोफोन सारखे फीचर्स आहेत. यामुळे तुम्ही कधीही कुठेही प्रवास करत असताना तुम्हाला बाहेरील आवाजाचा त्रास होणार नाही आणि तुम्ही तुमची गाण्यांची प्ले-लिस्ट एन्जॉय करू शकाल.

याच्या केसमध्ये वायरलेस चार्जिंग, Qi-Certified चार्जरसह “Find My” साठी बिल्ट-इन स्पीकर देण्यात आला आहे. Apple चे म्हणणे आहे की, AirPods 4 चे दोन्ही मॉडेल 100 टक्के फायबर-बेस्ड मटेरिअलने बनवण्यात आले आहेत.

किती आहे किंमत?

Apple AirPods 4 तुम्ही प्री-ऑर्डर करू शकता. याची किंमत 129 डॉलर्स आहे. तर Active Noise Cancellation मॉडेलची किंमत 179 डॉलर्स इतकी आहे. हे AirPods 20 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

Devendra Fadnavis : 'बटेंगे तो कटेंगे' हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT