नवीन iPhone 16 Series लॉन्च, AI फीचर्ससह मिळणार 48MP कॅमेरा, A18 Pro chip; जाणून घ्या किंमत

Apple ने आपली बहुप्रतीक्षित iPhone 16 Series लॉन्च केली आहे. या नवीन iPhone मध्ये काय खास पाहायला मिळणार आहे, किती असेल याची किंमत? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...
नवीन iPhone 16 Series लॉन्च, AI फीचर्ससह मिळणार 48MP कॅमेरा, A18 Pro chip; जाणून घ्या किंमत
iPhone 16 SeriesSaam Tv
Published On

प्रसिद्ध टेक कंपनी Apple ने बहुप्रतीक्षित iPhone 16 सिरीज लॉन्च केली आहे. Apple Event 2024 कंपनीने iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

या नवीन फोन्समध्ये हार्डवेअर आधारित कॅमेरा कंट्रोल बटण देखील दिला आहे. ज्यामुळे ग्राहकांचा फोटोग्राफीचा चांगला अनुभव घेता येणार आहे. याशिवाय या सिरीजमध्ये A18 आणि A18 Pro सह जबरदस्त परफॉर्मन्स अपग्रेड्स पाहायला मिळणार आहे.

नवीन iPhone 16 Series लॉन्च, AI फीचर्ससह मिळणार 48MP कॅमेरा, A18 Pro chip; जाणून घ्या किंमत
200MP कॅमेरा अन् AMOLED डिस्प्ले, 19 मिनिटात होतो फुल चार्ज; जबरदस्त आहेत 'हे' स्मार्टफोन्स

iPhone 16 आणि 16 Plus स्पेसिफिकेशन

Apple चा नवीन iPhone 16 एरोस्पेस ग्रेड ॲल्युमिनियम डिझाइनसह येतो. नवीन सिरीज 5 नवीन रंग पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. सेफ्टीसाठी यात ग्लास सिरेमिक शील्ड देण्यात आली आहे. iPhone 16 मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे. तर iPhone 16 Plus मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे.

याशिवाय नवीन फोन्समध्ये ॲक्शन बटण आणि हार्डवेअर आधारित कॅमेरा कंट्रोल देण्यात आलं आहे. ॲपलच्या इन-हाउस 6-कोर CPU आणि 5-कोर GPU सह 3nm A18 चिप्ससह यात खास ॲपल इंटेलिजेंस फीचर देण्यात आलं आहे. यामध्ये गेमिंगसाठी चांगले फीचर्स आणि हार्डवेअर अपग्रेड देण्यात आले आहेत.

नवीन कॅमेरा कंट्रोल बटणामुळे युजर्सला फोटो फोटो क्लिक करणं सोपं होणार आहे. हा बटन क्लिक केल्यावर अगदी सेकंदात कॅमेरा ओपन होतो. युजर्स या बटणासह लाईट प्रेस आणि क्लिक दोन्ही पर्याय मिळतील. या दोन्ही फोनमध्ये ग्राहकांना 48MP प्रायमरी कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड लेन्ससह ड्युअल 48MP फ्यूजन कॅमेरा सेटअप मिळेल. यात 12MP सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे.

iPhone 16 Pro आणि 16 Pro Max स्पेसिफिकेशन

नवीन iPhone 16 Pro मध्ये मोठा 6.3-इंचाचा डिस्प्ले आहे आणि iPhone 16 Pro Max मध्ये मोठा 6.9-इंचाचा डिस्प्ले आहे. हे दोन्ही फोन ग्रेड-5 टायटॅनियम बिल्डसह येतात. ऑन डिस्प्लेसह हे दोन्ही फोन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात. यात बॅटरी ऑप्टिमायझेशन आणि कूलिंग सिस्टम सारखे फीचर्सही ग्राहकांना मिळणार आहे.

नवीन iPhone 16 Series लॉन्च, AI फीचर्ससह मिळणार 48MP कॅमेरा, A18 Pro chip; जाणून घ्या किंमत
44,999 रुपये किंमत अन् 110km मायलेज, या आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक्स

याच्या प्रो मॉडेल्समध्ये Apple ने 3nm प्रोसेसवर आधारित 16-कोर न्यूरल इंजिन, 6-कोर CPU आणि 6-कोर GPU सह A18 Pro Chip दिली आहे. यात 48MP फ्यूजन कॅमेरा, 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 12MP 5x टेलीफोटो कॅमेरा सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात युजर्स DSLR कॅमेऱ्यांप्रमाणे फोकस लॉक करून कॅमेरा कंट्रोल बटणासह शूट करू शकतात.

iPhone 16 Series किंमत

नवीन सिरीजच्या किंमतबद्दल बोलायचं झालं तर iPhone 16 ची किंमत 799 डॉलर्सपासून सुरू होते आणि iPhone 16 Plus ची किंमत 899 डॉलर्सपासून सुरू होते. या दोन्ही फोनच्या बेस मॉडेलमध्ये 128GB स्टोरेज देण्यात आले. तसेच iPhone 16 Pro (128GB) ची किंमत 999 डॉलर्सपासून सुरू होते आणि iPhone 16 Pro Max (256GB) ची किंमत 1199 डॉलर्सपासून सुरू होते. प्रो मॉडेल ब्लॅक टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम आणि डेझर्ट टायटॅनियम या 4 रंग पर्यायांमध्ये येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com