Apaar ID Saam Tv
बिझनेस

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Apaar ID : पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अपार कार्ड दिले जाणार आहे. अपार कार्डचा उपयोग काय हे जाणून घ्या.

Siddhi Hande

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचे प्रयत्न सुरु आहे. यात अभ्यासक्रमातील बदलांपासून ते अनेक गोष्टींचा सामवेश आहे. या बदलांमध्ये विद्यार्थ्यांना अपार कार्ड बनवून घेण्यात सांगितले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला एक वेगळा ओळख क्रमांक दिला जाणार आहे.

अपार कार्डमुळे प्रत्येक विद्यार्थ्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. तसेच डिजिलॉकरची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची सर्व माहिती त्या अपार कार्डद्वारे आपल्याला समजणार आहे. एक देश, एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम आहे.

अपार म्हणजे काय?

अपार म्हणजे ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्र्री. पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे कार्ड मिळणार आहे. यामध्ये १२ अंकी ओळखक्रमांक दिला जाणार आहे. सध्या युनिफाइडड डिस्ट्रिक्ट अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लसमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी आहे.

याचा उपयोग काय?

प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती एकाच ठिकाणी सर्व माहिती सुरक्षित होणार आहे. डिजिलॉकरमध्ये तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे ठेवू शकतात. त्यामुळे तुम्हाला शिक्षणासाठी कोणतेही कागदपत्र लागले तर ते सहज शोधता येईल.जर कोणी शाळा बदलली तर तर त्याला सर्व कागदपत्रे नवीन शाळेत जमा करण्याची गरज पडणार आहे. तुमची सर्व कागदपत्रे डिजिलॉकरमध्ये असणार आहेत.

अपार कार्ड कसे बनवायचे? (How To Make Apaar Card)

अपार कार्ड बनवण्यासाठी शाळा पालकांशी संपर्क साधणार आहे. अपार साठी यू डायस नोंदणी नंबर, जन्मतारीख, मोबाईल नंबर, आई-वडिलांचे नावे, आधार कार्डवरील नाव या गोष्टी विचारल्या जाणार आहेत. विद्यार्थी जर १८ वर्षांपेक्षा लहान असेल तर या प्रोसेससाठी पालकांची संमती लागणार आहे. तुमचे अपार कार्ड तयार झाले तर ते डिजिलॉकरशी कनेक्ट केले जाईल.

डिजिलॉकर म्हणजे काय? (What Is Digilocker)

डिजिटल इंडिया या उपक्रमाअंतर्गत केंद्राने डिजिलॉकर सुरु कले आहे. क्लाउडवर आधारित डॉक्युमेंट वॉलेट तयार केले. सर्व कागदपत्रे डिजिटल असावीत, हा यामागचा उद्देश आहे. यावर तुमची सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्रे सुरक्षित ठेवली जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणात मानवाधिकार आयोगाकडून चौकशीचे आदेश

Election commission : निवडणुकीची घोषणा, याद्यांचा घोळ कायम; पत्रकारांच्या प्रश्नांवर आयोगाची भंबेरी, VIDEO

Mumbai : मुंबईत मानवतेला काळिमा! १ महिन्याचे बालक कचऱ्यात फेकले; समाजाला हादरवणारी घटना

Neral Matheran Train : शिट्टीचा आवाज घुमणार! माथेरानला बिंदास्त फिरायला जा, ‘हिल क्वीन’ गुरूवारपासून धावणार

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT